चांदवड : तालुक्यातील दिघवद येथे शेतकरी अविनाश बारगळ यांच्या शेतातील विहिरीत रात्रीच्या वेळी हरण पडल्याची घटना समोर आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस मित्र सागर गांगुर्डे यांनी चांदवड येथील प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यानंतर वन विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल प्रशांत पाटील, वनरक्षक वाल्मीक व्हरगळ, तसेच अशोक शिंदे, भरत वाघ आणि इफीक सय्यद यांनी विहिरीत पडलेल्या मृत हरणाला बाहेर काढले.
हरणाचा मृत्यू होऊन अंदाजे दोन ते तीन दिवस झाल्याने त्याचे शव खराब झाले होते. त्यामुळे घटनास्थळीच शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर वन विभागाच्या नियमानुसार शेतातच मृत हरणाचे दफन करण्यात आले.
यावेळी प्रशासक सरपंच रावसाहेब गांगुर्डे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सदाशिव गागरे, उपाध्यक्ष वसंत कोल्हे, तसेच नाना जेऊघाले, पवण सोनवणे, सदाशिव जेऊघाले यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
दुष्काळामुळे वन्यप्राण्यांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर
दिघवद, बोपाणे, तिसगाव, उर्दूळ आदी परिसरात विविध प्रकारचे वन्यप्राणी तसेच पक्ष्यांचा वावर आहे. सध्या परिसरात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने वन्यप्राण्यांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. पाण्याच्या शोधात वन्यप्राणी मानवी वस्तीकडे तसेच शेतशिवारात येत असल्याचे चित्र आहे.
वन्यप्राण्यांसाठी परिसरात पाणवठे उपलब्ध करून देणे तसेच त्यांच्या संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे






