• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अपर तहसीलच्या निर्णयाने जारावंडीच्या तोंडाला पाने पुसली!

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 26, 2026
in Blog
0
अपर तहसीलच्या निर्णयाने जारावंडीच्या तोंडाला पाने पुसली!
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

४० वर्षांचा लढा निष्फळ; दुसऱ्या ठिकाणी कार्यालय मंजूर झाल्याने नागरिकांमध्ये संताप

प्रतिनिधी :

RelatedPosts

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन

एटापल्ली : प्रशासनाच्या सोयीसाठी नवीन तहसील व अपर तहसील कार्यालये सुरू करण्याचा निर्णय शासनाकडून घेतला जात असतानाच, एटापल्ली तालुक्यातील जारावंडी परिसराला या निर्णयातून वगळण्यात आल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तब्बल चार दशकांपासून जारावंडीला तहसील अथवा अपर तहसीलचा दर्जा मिळावा, यासाठी सुरू असलेला संघर्ष पुन्हा एकदा उपेक्षित राहिल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.

जारावंडीला तहसीलचा दर्जा मिळावा, यासाठी गेल्या ४० वर्षांपासून आंदोलने, निवेदने तसेच मंत्रालय स्तरापर्यंत सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. मात्र, जारावंडीऐवजी अन्य ठिकाणी अपर तहसील कार्यालय मंजूर झाल्याने शासनाने जारावंडीच्या मागणीला डावलल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.

जारावंडी हा एटापल्ली तालुक्याचा विस्तीर्ण, दुर्गम आणि सीमावर्ती भाग आहे. या परिसरातील शेकडो गाव-पाड्यांतील नागरिकांना किरकोळ महसुली कामांसाठीही तब्बल ७० ते ८० किलोमीटर अंतर पार करून एटापल्ली येथे यावे लागते. त्यामुळे नागरिकांचा वेळ, पैसा आणि श्रम मोठ्या प्रमाणात खर्च होतात. शासनाचा प्रशासनाचे विकेंद्रीकरण करून नागरिकांना शासकीय सेवा त्यांच्या जवळ उपलब्ध करून देण्याचा उद्देश असेल, तर जारावंडीसारख्या अतिदुर्गम भागाकडे दुर्लक्ष का करण्यात आले, असा रोखठोक सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

चार दशकांचा संघर्ष व्यर्थ?

जारावंडीला तहसीलचा दर्जा मिळावा यासाठी माझे वडील कै. बाजीराव कुमरे यांनी आपले आयुष्य पणाला लावून संघर्ष केला. मात्र, चार दशकांनंतरही या भागाला डावलून अन्य ठिकाणी अपर तहसील कार्यालयाचा विचार होणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. शासनाने या निर्णयाचा फेरविचार करून जारावंडीला न्याय द्यावा, अशी मागणी कै. बाजीराव कुमरे यांचे सुपुत्र योगेश कुमरे यांनी केली.

भौगोलिक विस्तार लक्षात घेऊन निर्णयाची मागणी

जारावंडी तालुका कृती समिती तसेच परिसरातील नागरिकांनी या मागणीसाठी सातत्याने संघर्ष केला आहे. जारावंडीचा भौगोलिक विस्तार, दुर्गम भागातील नागरिकांना होणारा त्रास आणि महसुली कामांसाठीचे लांबचे अंतर लक्षात घेता येथेच अपर तहसील कार्यालय सुरू होणे गरजेचे आहे. शासनाने नागरिकांच्या हिताचा विचार करून या निर्णयाचा तातडीने फेरविचार करावा, अशी मागणी जारावंडी तालुका कृती समितीचे अध्यक्ष सुधारकर टेकाम यांनी केली आहे.

Previous Post

जनता पूर्व प्राथमिक शाळा खोपोलीच्या मुख्याध्यापिका सौ. समिक्षा ढोके यांना महाराष्ट्र राज्य आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार

Next Post

सुरजागड इलाक्यातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Related Posts

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक
Blog

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
0
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप
Blog

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026
0
बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन
Blog

बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन

September 26, 2026
5
सुरजागड इलाक्यातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Blog

सुरजागड इलाक्यातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

September 26, 2026
0
जनता पूर्व प्राथमिक शाळा खोपोलीच्या मुख्याध्यापिका सौ. समिक्षा ढोके यांना महाराष्ट्र राज्य आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार
Blog

जनता पूर्व प्राथमिक शाळा खोपोलीच्या मुख्याध्यापिका सौ. समिक्षा ढोके यांना महाराष्ट्र राज्य आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार

September 26, 2026
0
शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप
Blog

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 25, 2026
35
Next Post
सुरजागड इलाक्यातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सुरजागड इलाक्यातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In