• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मऱ्हळ येथे लोणारी युवा संघाचे मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर उत्साहात

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 27, 2026
in Blog
0
मऱ्हळ येथे लोणारी युवा संघाचे मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर उत्साहात
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

तुलशी आय हॉस्पिटल, नाशिकच्या सहकार्याने आयोजन; सुमारे १५० नागरिकांची नेत्र तपासणी, गरजेनुसार शस्त्रक्रियेबाबत मार्गदर्शन

मऱ्हळ, प्रतिनिधी : लोणारी युवा संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने तुलशी आय हॉस्पिटल, नाशिक यांच्या सहकार्याने मऱ्हळ येथे मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. श्री लोमेष ऋषी सार्वजनिक वाचनालय, हनुमान मंदिर, मऱ्हळ येथे २४ सप्टेंबर रोजी झालेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

RelatedPosts

मालेगावात गणेश विसर्जन मिरवणुकीला उत्साहात सुरुवात

निमसोड देवनगर येथे गणेश मित्र मंडळातर्फे महापूजा व सत्कार

म्हैशीच्या प्रसूतीवेळी पशुवैद्यकीय डॉक्टरांची तत्परता

तज्ञ डॉक्टरांची टीम, प्रशिक्षित तंत्रज्ञ तसेच अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांच्या सहाय्याने शिबिर घेण्यात आले. तुलशी आय हॉस्पिटलचे डॉ. पिंजारी व डॉ. धोंगडे यांनी सुमारे १५० नागरिकांची नेत्र तपासणी करून आवश्यक शस्त्रक्रिया, उपचार व पुढील वैद्यकीय प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले. रुग्णांच्या सुविधेसाठी हॉस्पिटलच्या वतीने मोफत फिरता दवाखाना व्हॅन तसेच प्रशिक्षित तंत्रज्ञ उपलब्ध करून देण्यात आले.

शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी लोणारी युवा संघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक व अध्यक्ष विजय संवत्सरकर, ह.भ.प. रमण हिंगे महाराज, भोकणी हायस्कूलचे मुख्याध्यापक रानडे सर, सुरेगावचे सरपंच रमेश इलग, मुख्याध्यापक मोरे सर, शिंगणापूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच संजय तुळसकर, प्रवीण गेंद साहेब व संजय कुऱ्हे उपस्थित होते. केरू कुऱ्हे, एम. जी. कुऱ्हे सर व धेंडुळे सर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी लोणारी युवा संघाच्या वतीने मऱ्हळ पंचक्रोशीतील सार्वजनिक गणपती मंडळांची पर्यावरण, प्रदूषणमुक्तता व उत्कृष्ट सजावट या निकषांवर स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये शिवतांडव मित्र मंडळ व श्रीगणेशा मित्र मंडळ यांना प्रथम, विघ्नहर्ता मित्र मंडळाला द्वितीय तर भवानी मित्र मंडळाला तृतीय क्रमांक मिळाला. विजेत्या मंडळांना सन्मानचिन्ह व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

तसेच ७५ वर्षीय ‘लोणारी भूषण’ अशोक अण्णा लोणारी बुल्हे यांनी पॉवरलिफ्टिंगमधील डेडलिफ्टिंग प्रकारात जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल लोणारी युवा संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने त्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी तालुकाध्यक्ष नितीन कुऱ्हे, जिल्हाप्रमुख चंद्रकांत कुऱ्हे, कैलास आढाव सर, खजिनदार अनिल इंगळे, ललित संवत्सरकर, यश कुऱ्हे, ऋषिकेश धोक्रट, नवनाथ धोक्रट, मयुरेश कुऱ्हे व सचिन थिटे यांनी विशेष परिश्रम घेतले. ग्रामपंचायत मऱ्हळ तसेच ग्रामस्थांनीही शिबिरासाठी सहकार्य केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन के. आर. कुऱ्हे सर यांनी केले. अध्यक्षीय भाषणात विजय संवत्सरकर यांनी तुलशी आय हॉस्पिटल, ग्रामपंचायत मऱ्हळ व ग्रामस्थांचे सहकार्याबद्दल आभार मानले.

Previous Post

मालेगावात गणेश विसर्जन मिरवणुकीला उत्साहात सुरुवात

Related Posts

मालेगावात गणेश विसर्जन मिरवणुकीला उत्साहात सुरुवात
Blog

मालेगावात गणेश विसर्जन मिरवणुकीला उत्साहात सुरुवात

September 27, 2026
1
निमसोड देवनगर येथे गणेश मित्र मंडळातर्फे महापूजा व सत्कार
Blog

निमसोड देवनगर येथे गणेश मित्र मंडळातर्फे महापूजा व सत्कार

September 27, 2026
0
म्हैशीच्या प्रसूतीवेळी पशुवैद्यकीय डॉक्टरांची तत्परता
Blog

म्हैशीच्या प्रसूतीवेळी पशुवैद्यकीय डॉक्टरांची तत्परता

September 27, 2026
3
श्री. पी. के. अण्णा पाटील फाउंडेशनचे पुरुषोत्तम पुरस्कार जाहीर
Blog

श्री. पी. के. अण्णा पाटील फाउंडेशनचे पुरुषोत्तम पुरस्कार जाहीर

September 27, 2026
2
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ‘समता क्रांती मार्च’ तूर्तास स्थगित
Blog

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ‘समता क्रांती मार्च’ तूर्तास स्थगित

September 27, 2026
7
उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार
Blog

उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार

September 27, 2026
48

ताज्या बातम्या

मऱ्हळ येथे लोणारी युवा संघाचे मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर उत्साहात

मऱ्हळ येथे लोणारी युवा संघाचे मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर उत्साहात

September 27, 2026
मालेगावात गणेश विसर्जन मिरवणुकीला उत्साहात सुरुवात

मालेगावात गणेश विसर्जन मिरवणुकीला उत्साहात सुरुवात

September 27, 2026
नायक प्रतिष्ठानतर्फे हरिश्चंद्र तांडा शाळेत मोफत शैक्षणिक साहित्य वाटप

नायक प्रतिष्ठानतर्फे हरिश्चंद्र तांडा शाळेत मोफत शैक्षणिक साहित्य वाटप

September 27, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In