• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

महाराष्ट्रातील २६५ तालुक्यांत दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर; १२ उपाययोजना व सवलती लागू

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 27, 2026
in Blog
0
0
SHARES
7
VIEWS
Ad 1
Ad 1

३५८ पैकी २६५ तालुक्यांचा समावेश; पीक कर्ज पुनर्गठन, जमीन महसूल व कृषी पंपाच्या वीजबिलात सवलतीसह पाणी-चारा व रोजगाराच्या उपाययोजना

पुणे : प्रतिनिधी राज्यातील पावसातील तूट आणि निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केली आहे. या तालुक्यांतील शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, विद्यार्थी तसेच पशुधनाला दिलासा देण्यासाठी १२ उपाययोजना व सवलती लागू करण्यात आल्या आहेत.

RelatedPosts

शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीला काळ्याची वाडीतील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

पुणे मेट्रोच्या नव्या मार्गामुळे आयटी कर्मचाऱ्यांचा प्रवास सुसाट

समर्पण ग्रुप – माणुसकीचा दीप उजळवणारा अनोखा सेवायज्ञ!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळी परिस्थितीत शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकरी हे मदतीच्या केंद्रस्थानी असल्याचे सांगितले. दुष्काळाच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले.

विभागनिहाय तालुक्यांची संख्या

ठाणे विभाग – १२
नाशिक विभाग – ४९
पुणे विभाग – ३५
छत्रपती संभाजीनगर विभाग – ७४
अमरावती विभाग – ५६
नागपूर विभाग – ३९

या निर्णयात राज्यातील विविध जिल्ह्यांतील एकूण २६५ तालुक्यांचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वाधिक ७४ तालुके समाविष्ट आहेत.

शासनाच्या १२ उपाययोजना व सवलती

१. जमीन महसुलात सूट.
२. पीक कर्जाचे पुनर्गठन.
३. शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती.
४. ७.५ अश्वशक्तीपर्यंतच्या कृषी पंपांच्या चालू वीजबिलात सवलत.
५. शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी.
६. रोजगार हमी योजनेअंतर्गत कामांच्या निकषांत शिथिलता.
७. पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा.
८. टंचाई जाहीर झालेल्या गावांमध्ये कृषी पंपांची वीजजोडणी खंडित न करण्याची उपाययोजना.
९. अन्नधान्याचा पुरेसा पुरवठा.
१०. जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देणे.
११. जलसंधारणाची कामे सुरू करणे.
१२. पिण्याचे पाणी तसेच जनावरांसाठी पाण्याचे नियोजन करणे.

पीक नुकसानीसाठी स्वतंत्र मदत

दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर झाल्यामुळे वरील सवलती लागू करण्यात आल्या असल्या तरी पीक नुकसानीची प्रत्यक्ष मदत स्वतंत्र प्रक्रियेद्वारे निश्चित केली जाणार आहे. पीक परिस्थितीचे सर्वेक्षण आणि पंचनाम्यांच्या आधारे आवश्यक कार्यवाही करून स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे मदत जाहीर केली जाणार आहे.

पावसातील तूट, पिकांची परिस्थिती, पाणीटंचाई आणि पशुधनासाठी उपलब्ध संसाधने लक्षात घेऊन प्रशासनाने आवश्यक उपाययोजना राबविण्यावर भर दिला आहे.

Ad 1
Tags: Ashok Chavan
Previous Post

भक्तिभाव, ढोल-ताशांचा निनाद आणि भावपूर्ण निरोप; पुण्यात गणरायाच्या विसर्जनाची सांगता

Next Post

विद्यार्थ्यांना दिलासा; पुणे विद्यापीठाने मेसच्या जेवणाची प्रस्तावित दरवाढ घेतली मागे

Related Posts

शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीला काळ्याची वाडीतील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध
Blog

शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीला काळ्याची वाडीतील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

November 12, 2026
72
Blog

पुणे मेट्रोच्या नव्या मार्गामुळे आयटी कर्मचाऱ्यांचा प्रवास सुसाट

November 12, 2026
3
समर्पण ग्रुप – माणुसकीचा दीप उजळवणारा अनोखा सेवायज्ञ!
Blog

समर्पण ग्रुप – माणुसकीचा दीप उजळवणारा अनोखा सेवायज्ञ!

November 12, 2026
13
सिगालोवाद सुत्ताच्या माध्यमातून गृहस्थ जीवनाला धम्माची दिशा!
Blog

सिगालोवाद सुत्ताच्या माध्यमातून गृहस्थ जीवनाला धम्माची दिशा!

November 12, 2026
17
बचतीतून गोडवा, एकीतून दिवाळी! एरंडोलीच्या गरुडझेप महिला ग्रामसंघाचा प्रेरणादायी उपक्रम
Blog

बचतीतून गोडवा, एकीतून दिवाळी! एरंडोलीच्या गरुडझेप महिला ग्रामसंघाचा प्रेरणादायी उपक्रम

November 11, 2026
15
सालोरा–धोत्रा मार्गावर एसटी बस नाल्यात उलटली; २२ प्रवासी सुखरूप
Blog

सालोरा–धोत्रा मार्गावर एसटी बस नाल्यात उलटली; २२ प्रवासी सुखरूप

November 11, 2026
62
Next Post

विद्यार्थ्यांना दिलासा; पुणे विद्यापीठाने मेसच्या जेवणाची प्रस्तावित दरवाढ घेतली मागे

ताज्या बातम्या

भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त शहाद्यात ११ ते १८ नोव्हेंबरदरम्यान ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह’!

भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त शहाद्यात ११ ते १८ नोव्हेंबरदरम्यान ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह’!

November 12, 2026
अष्टविनायकांचा कायापालट! महाडच्या वरदविनायक मंदिरात विकासकामांना वेग

अष्टविनायकांचा कायापालट! महाडच्या वरदविनायक मंदिरात विकासकामांना वेग

November 12, 2026
सहकार विकास आघाडीच्या बळावर जिल्हा बँकेत नवे नेतृत्व!

सहकार विकास आघाडीच्या बळावर जिल्हा बँकेत नवे नेतृत्व!

November 12, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In