दत्तनगर-पडवळवस्ती येथे भक्तिमय वातावरणात विसर्जन सोहळा; तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग
शिरूर : प्रतिनिधी
शिरूर तालुक्यातील निमगाव दुडे येथील दत्तनगर-पडवळवस्ती परिसरात गणपती बाप्पांचा विसर्जन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. डीजे साउंड सिस्टमच्या गजरात तरुण मंडळांनी ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’चा जयघोष करत बाप्पांना भावपूर्ण निरोप दिला.
पारंपरिक वाद्ये, आतषबाजी आणि पुष्पवृष्टीमुळे परिसर भक्तिमय झाला होता. सोमनाथ भोरडे यांच्या साउंड सिस्टमने मिरवणुकीत विशेष लक्ष वेधून घेतले. डीजेवर गणेश भक्तिगीते व पारंपरिक धून वाजवत मिरवणूक उत्साहात पार पडली.
यावेळी महिला, युवक व ग्रामस्थांसह जनार्दन भोरडे, सनी पानगे, प्रवीण चौधरी, पांडुरंग चौधरी, शुभम चौधरी, अविष्कार भोरडे, विहान कदम, तुकाराम चौधरी, दत्तात्रेय चौधरी, वैष्णव भोरडे, संतोष पानगे (बॉस), सूरज पानगे, बाळकृष्ण पडवळ, संदिप भोरडे, अक्षय चौधरी व अभिषेक चौधरी आदी उपस्थित होते. शांततेत विसर्जन पार पडले.





