भवानीनगरच्या प्रसिद्ध एकतारी भजनी मंडळाने सादर केले अभंग-भजन; भाविक मंत्रमुग्ध
भवानीनगर : प्रतिनिधी
भवानीनगर येथील शिवशक्ती गणेश मंडळाच्या वतीने आदेश एकतारी भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात गायक, वादक, टाळकरी व कोरस यांनी भक्तिमय वातावरण निर्माण केले.
यावेळी आकाश गोंदिल, सिद्धू महाराज, अनिल गोडसे, दत्तात्रय माने, पिंटू औताडे, शंकर गोडसे तसेच वादक योगेश जवारे, किरकिट वादक सुरेश दमामे, रोहन, सोहम, अजित महाराज, सगुना ताई, शारदा ताई, विजय मोहिते, ज्ञानु माऊली, विलास पवार, पांडू कोळी आदी सहभागी झाले होते.
आदेश भजनी मंडळ हे भवानीनगर व पंचक्रोशीतील परिचित भजनी मंडळ असून त्यांच्या कार्यक्रमांना गणेशोत्सव तसेच आगामी नवरात्रोत्सवात विविध मंडळांकडून मागणी असल्याचे सांगण्यात आले. भजन ऐकताना भाविक मंत्रमुग्ध होऊन जात असल्याचे आयोजकांनी सांगितले.
ज्यांना या भजनी मंडळाचा कार्यक्रम आयोजित करायचा आहे त्यांनी संपर्क : 9175701763 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
आदेश एकतारी भजनी मंडळ, भवानीनगर, ता. वाळवा, जि. सांगली





