प्रो. विलास बांगर यांच्या डिझाइनला पेटंट नोंदणी; डॉ. दीपक शेंडगे यांना पीएच.डी. पदवी
काष्टी : प्रतिनिधी
मा. श्री. बबनराव पाचपुते विचारधारा ट्रस्टच्या परिक्रमा डिप्लोमा इन फार्मास्युटिकल सायन्सेस, काष्टी तसेच HSBPVT’s ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, फॅकल्टी ऑफ फार्मसी, परिक्रमा काष्टी येथील प्राध्यापकांनी संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत संस्थेच्या लौकिकात भर घातली आहे. प्रो. विलास बाळासाहेब बांगर यांच्या डिझाइनला नोंदणी मिळाली असून प्रा. डॉ. दीपक शरद शेंडगे यांनी पीएच.डी. पदवी संपादन केली आहे.
प्रो. विलास बाळासाहेब बांगर यांच्या “Transdermal Foot Patch for Improving Sleep Quality” या अभिनव संकल्पनेच्या डिझाइनला Design No. 407109-001 अंतर्गत नोंदणी प्राप्त झाली असून त्याला अधिकृत “Granted” दर्जा मिळाला आहे. Designs Act, 2000 आणि Designs Rules, 2001 अंतर्गत झालेली ही नोंदणी आधुनिक औषध-वितरण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील महत्त्वपूर्ण कामगिरी मानली जात आहे. झोपेची गुणवत्ता सुधारण्याच्या उद्देशाने विकसित करण्यात आलेल्या ट्रान्सडर्मल फुट पॅचच्या संकल्पनेची दखल या नोंदणीद्वारे घेण्यात आली आहे.
त्याचबरोबर परिक्रमा कॉलेज ऑफ फार्मसीचे प्रा. डॉ. दीपक शरद शेंडगे यांनी “Design and Investigation of Enhanced Pharmacokinetics for Poorly Water-Soluble Medicines” या विषयावर संशोधन करून सनराईज युनिव्हर्सिटी, अलवर येथून पीएच.डी. पदवी संपादन केली आहे. त्यांच्या संशोधनाला डॉ. वाकुरे बी. एस. यांचे मार्गदर्शन लाभले.
अध्यापनासोबत संशोधन व नवोपक्रमाला प्रोत्साहन देणाऱ्या या दोन्ही प्राध्यापकांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल परिक्रमा संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य, शिक्षकवृंद, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन केले. पीएच.डी. आणि डिझाइन नोंदणीच्या या दुहेरी यशामुळे परिक्रमा कॉलेज ऑफ फार्मसीच्या संशोधनपर वाटचालीला नवी ऊर्जा मिळाली आहे.






