नियंत्रण सुटलेल्या बसची तीन रिक्षा आणि कारला धडक; जखमींना एमजीएम रुग्णालयात दाखल
बेलापूर : प्रतिनिधी
मुंबईहून मुरूडच्या दिशेने जाणाऱ्या बसचे अचानक ब्रेक फेल झाल्याने बेलापूर येथे अपघात झाला. नियंत्रण सुटलेल्या बसने तीन रिक्षा आणि एका कारला जोरदार धडक दिल्याने परिसरात काही काळ खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अपघातातील जखमींना उपचारासाठी बेलापूर येथील एमजीएम रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
अपघातामुळे परिसरातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. दरम्यान, जखमींची नेमकी संख्या तसेच अपघाताबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.





