• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

युवा महोत्सवातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 28, 2026
in Blog
0
युवा महोत्सवातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

आवडीच्या क्षेत्रात प्रावीण्य मिळवून देशाच्या उंचीत योगदान द्या : प्राचार्य अभयकुमार सांळुखे

जत, दि. २८ : प्रतिनिधी –

RelatedPosts

लंच टाईम की ‘अनलिमिटेड’ टाईम? सरकारी कार्यालयांतील वेळेच्या शिस्तीवर प्रश्न

शिवनी धोबे येथे ३१ वर्षीय युवकाचा मृत्यू

रिसोड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर; चंद्रकांतदादा ठाकरे यांचा सातत्याने पाठपुरावा

“विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळाले पाहिजे. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात प्रावीण्य मिळवून त्यातून अर्थार्जन करण्याबरोबरच समाज आणि देशाच्या उभारणीत योगदान द्यावे. आपल्या कलेच्या माध्यमातून देशाला बळ मिळू शकते आणि देशाची उंचीही वाढू शकते,” असे प्रतिपादन प्राचार्य अभयकुमार सांळुखे यांनी केले.

राजे रामराव महाविद्यालय, जत येथे शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाच्या मार्गदर्शनाखाली आयोजित ४६ व्या युवा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. युवा शक्तीमध्ये मोठे परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता असून, ही शक्ती राष्ट्रउभारणीसाठी वापरली पाहिजे. विद्यार्थ्यांच्या कला व आवडीला प्रोत्साहन देण्याचे काम शिक्षक आणि गुरुदेव कार्यकर्त्यांनी करावे, असेही त्यांनी सांगितले.

युवा महोत्सव हा केवळ विविध कलाप्रकारांच्या स्पर्धांचा कार्यक्रम नसून विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला व्यासपीठ देणारा, आत्मविश्वास वाढविणारा आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणारा उत्सव आहे. शिक्षण म्हणजे केवळ पुस्तके, परीक्षा आणि गुण नसून विद्यार्थ्यांना विचार करायला शिकविणे, कला व्यक्त करण्याची संधी देणे आणि संस्कृतीशी जोडून ठेवणे महत्त्वाचे आहे, असे सांळुखे यांनी नमूद केले.

यावेळी प्रमुख पाहुणे शशिकांत काळगी यांनी विद्यार्थ्यांमध्ये गायक, नर्तक, अभिनेते, लेखक, चित्रकार तसेच विविध लोककलांमध्ये प्रावीण्य मिळविण्याची क्षमता असल्याचे सांगितले. युवा महोत्सवाच्या माध्यमातून या प्रतिभेला योग्य व्यासपीठ, प्रोत्साहन आणि दिशा मिळते. विद्यार्थ्यांनी निकालाची चिंता न करता आत्मविश्वासाने कलेचे सादरीकरण करावे. मंचावर स्पर्धा असली तरी मनामध्ये मैत्री असावी, असे आवाहन त्यांनी केले.

प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य कृष्णा रानगर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी विवेकानंद संस्थेचे माजी अर्थसचिव पी. एस. चव्हाण, आजीव सेवक कृष्णा बिसले, विद्यार्थी विकास मंडळाचे डॉ. एस. जी. घाणे, प्राचार्य डॉ. सुरेश पाटील, सर्वोदय शिक्षण संस्था उमदीचे एस. के. होर्तिकर आदी मान्यवर उपस्थित होते.

शिवाजी विद्यापीठाच्या ४६ व्या जिल्हास्तरीय युवा महोत्सवात सांगली जिल्ह्यातील ५६ महाविद्यालयांमधून १,२८९ विद्यार्थी सहभागी झाले असून विविध कलाप्रकारांतून विद्यार्थी आपली कला सादर करणार आहेत.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रामदास बनसोडे व प्रा. लक्ष्मण मासाळ यांनी केले. युवा महोत्सवाचे समन्वयक तथा सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. सतीशकुमार पडोळकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, संघ व्यवस्थापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थांचे पदाधिकारी, विद्यार्थी व कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: Arun Koli
Previous Post

लकी ड्रॉतील गाळे परत मिळावेत; दुसऱ्यांदा बेमुदत उपोषण सुरू

Next Post

SIR सुनावणीसाठी नागरिकांनी कागदपत्रांसह उपस्थित राहावे

Related Posts

Blog

लंच टाईम की ‘अनलिमिटेड’ टाईम? सरकारी कार्यालयांतील वेळेच्या शिस्तीवर प्रश्न

September 28, 2026
4
शिवनी धोबे येथे ३१ वर्षीय युवकाचा मृत्यू
Blog

शिवनी धोबे येथे ३१ वर्षीय युवकाचा मृत्यू

September 28, 2026
2
Blog

रिसोड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर; चंद्रकांतदादा ठाकरे यांचा सातत्याने पाठपुरावा

September 28, 2026
0
अक्कलकोटच्या कार्यकर्त्यांनी वर्धापन दिनास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे – सैदप्पा झळकी
Blog

अक्कलकोटच्या कार्यकर्त्यांनी वर्धापन दिनास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे – सैदप्पा झळकी

September 28, 2026
3
Blog

धानोरी–विश्रांतवाडीत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस

September 28, 2026
1
माढेली येथे डीजेच्या कानठळी बसवणाऱ्या आवाजाला फाटा; पारंपरिक वारकरी पद्धतीने गणपती विसर्जन
Blog

माढेली येथे डीजेच्या कानठळी बसवणाऱ्या आवाजाला फाटा; पारंपरिक वारकरी पद्धतीने गणपती विसर्जन

September 28, 2026
0
Next Post
SIR सुनावणीसाठी नागरिकांनी कागदपत्रांसह उपस्थित राहावे

SIR सुनावणीसाठी नागरिकांनी कागदपत्रांसह उपस्थित राहावे

ताज्या बातम्या

घुंगराळा येथे पशुवैद्यकीय दवाखाना मंजूर करण्याची मागणी

घुंगराळा येथे पशुवैद्यकीय दवाखाना मंजूर करण्याची मागणी

September 28, 2026
ऊस दरवाढीसाठी खुदावाडी येथे शेतकऱ्यांची बैठक

ऊस दरवाढीसाठी खुदावाडी येथे शेतकऱ्यांची बैठक

September 28, 2026
नळदुर्गजवळ स्कूल बस पलटी; आठ विद्यार्थी जखमी

नळदुर्गजवळ स्कूल बस पलटी; आठ विद्यार्थी जखमी

September 28, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In