• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पिण्याच्या पाण्याचा अनधिकृत उपसा केल्यास कठोर कारवाई; जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा इशारा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 2, 2026
in Blog
0
पिण्याच्या पाण्याचा अनधिकृत उपसा केल्यास कठोर कारवाई; जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा इशारा
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

जलाशयातील पाणीसाठा सिंचनासाठी वापरण्यास मनाई; मोटारपंप, टँकरसह साहित्य जप्त करून गुन्हा दाखल करणार

नांदेड, दि. १ : नांदेड पाटबंधारे विभागाच्या विविध जलाशयांमधील पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित ठेवण्यात आला असून, या पाण्याचा अनधिकृत उपसा करून सिंचनासाठी वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिला आहे.

RelatedPosts

चांदवड तालुका दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याची मागणी; उपोषण तात्पुरते स्थगित

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

नांदेड पाटबंधारे विभाग (उत्तर) अंतर्गत शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पातील अन्तेश्वर उच्च पातळी बंधारा, विष्णुपुरी उच्च पातळी बंधारा व रेणापूर सुधा लघु प्रकल्प, तसेच नांदेड पाटबंधारे विभाग (दक्षिण) अंतर्गत उर्ध्व मानार प्रकल्प, लिंबोटी येथील संपूर्ण पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित ठेवण्यात आला आहे. या पाणीसाठ्याचा नियोजनानुसार वापर व्हावा आणि अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी प्रशासनाने संबंधितांना सूचना दिल्या आहेत.

पाटबंधारे विभागाच्या १२ डिसेंबर २०१८ रोजीच्या शासन निर्णयानुसार या आरक्षित पाणीसाठ्याचे नियोजन व अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित जलाशयांवरील सर्व परवानाधारक शेतकऱ्यांनी पाणीसाठा केवळ पिण्यासाठी आरक्षित असल्याची नोंद घेऊन मोटारपंप, इंजिन, टँकर अथवा अन्य साधनांद्वारे पाणी उपसा करून सिंचन करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

जलाशय परिसरात असलेले मोटारपंप, इंजिन, टँकर, स्टार्टर, केबल, सर्व्हिस वायर तसेच अन्य साहित्य संबंधितांनी स्वतःहून काढून घ्यावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पाण्याचा अनधिकृत उपसा होत असल्याचे आढळून आल्यास संबंधितांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. तसेच भरारी पथकाद्वारे मोटारपंप, इंजिन, टँकर, स्टार्टर, केबल, सर्व्हिस वायर आदी साहित्य जप्त करून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित असलेल्या पाणीसाठ्याचे संरक्षण आणि उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करण्यासाठी सर्व संबंधितांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

Previous Post

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

Next Post

चांदवड तालुका दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याची मागणी; उपोषण तात्पुरते स्थगित

Related Posts

चांदवड तालुका दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याची मागणी; उपोषण तात्पुरते स्थगित
Blog

चांदवड तालुका दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याची मागणी; उपोषण तात्पुरते स्थगित

October 2, 2026
0
Blog

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
20
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड
Blog

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
51
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड
Blog

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026
4
दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार
Blog

दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार

October 1, 2026
15
बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन
Blog

बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

October 1, 2026
61
Next Post
चांदवड तालुका दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याची मागणी; उपोषण तात्पुरते स्थगित

चांदवड तालुका दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याची मागणी; उपोषण तात्पुरते स्थगित

ताज्या बातम्या

चांदवड तालुका दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याची मागणी; उपोषण तात्पुरते स्थगित

चांदवड तालुका दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याची मागणी; उपोषण तात्पुरते स्थगित

October 2, 2026
पिण्याच्या पाण्याचा अनधिकृत उपसा केल्यास कठोर कारवाई; जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा इशारा

पिण्याच्या पाण्याचा अनधिकृत उपसा केल्यास कठोर कारवाई; जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा इशारा

October 2, 2026

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In