• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नेरूळमध्ये आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 2, 2026
in Blog
0
नेरूळमध्ये आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

ज्येष्ठ नागरिकांचा भव्य सत्कार सोहळा व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात; ज्येष्ठ नागरिक महामंडळाच्या स्थापनेबाबत माहिती

नेरूळ, नवी मुंबई (प्रतिनिधी)

RelatedPosts

कुऱ्हा-मांडवा धरण प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या २५ वर्षांनंतरही प्रलंबित

नोटीस काढूनही ग्रामसभा टळली; ग्रामसेवक संघटनेच्या बहिष्काराचे कारण पुढे

शेतकरी कुटुंबातील शिवप्रसाद बोडके यांची MBBS प्रवेशासाठी निवड

आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिक महामंडळ, महाराष्ट्र राज्य व ज्येष्ठ नागरिक संघ, नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांचा भव्य सत्कार सोहळा व सांस्कृतिक कार्यक्रम गुरुवारी (दि. १ ऑक्टोबर २०२६) ज्येष्ठ नागरिक भवन, सेक्टर १२, नेरूळ येथे उत्साहात पार पडला. सायंकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर ज्येष्ठ नागरिक चळवळीची मुहूर्तमेढ रोवणारे रोटरियन डॉ. राधाकृष्णन भट्ट यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र शासन, समाज कल्याण, मुंबई विभागाचे जनसंपर्क अधिकारी संजय भोसले यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्य करणाऱ्या मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. त्यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनाच्या विविध उपक्रमांची माहिती देताना ज्येष्ठांना सन्मानपूर्वक व सुरक्षित जीवन जगता यावे, त्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहावे, आर्थिक व वैद्यकीय मदत मिळावी, तसेच छळ-पिळवणुकीपासून संरक्षण मिळावे यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत माहिती दिली.

महाराष्ट्र शासनाने ज्येष्ठ नागरिक महामंडळ स्थापन करण्यास मान्यता दिल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. या महामंडळाचे मुख्यालय मुंबई येथे राहणार असून, शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले.

ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या सुविधांसाठी महाराष्ट्र सरकारने ज्येष्ठ नागरिक महामंडळाला मंजुरी दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे प्रवासातील सुविधा व तिकिटातील सवलती मिळाव्यात यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

सामाजिक संस्था, नेरूळचे अध्यक्ष दिगंबर चापके यांनी ज्येष्ठ नागरिक महामंडळाच्या स्थापनेसाठी डॉ. अण्णासाहेब टेकाळे यांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. नवी मुंबईतील विरंगुळा केंद्रे आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष कक्ष उभारण्यात ज्येष्ठ नागरिक संघटनांच्या योगदानाचा उल्लेख त्यांनी केला.

मुंबई-नवी मुंबई प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष सुरेश पोटे यांनी उपस्थितांचे आभार मानत ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू असलेल्या सामाजिक कार्याची माहिती दिली. ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष अरविंद वाळवेकर यांनी ज्येष्ठ नागरिकांना दिनाच्या शुभेच्छा देत डॉ. अण्णासाहेब टेकाळे यांच्या कार्याचे कौतुक केले.

अध्यक्ष विकास साठे यांनी १ ऑक्टोबर हा जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा करण्यामागील पार्श्वभूमी सांगितली. संयुक्त राष्ट्रसंघाने १९९० मध्ये याबाबत ठराव केला असून, १९९१ पासून १ ऑक्टोबर हा जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. कुटुंब व समाजासाठी ज्येष्ठांनी दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाच्या सांस्कृतिक सत्रात ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य ब्रिजेश श्रीवास्तव यांच्या माध्यमातून ‘स्वरम कराओके ऑर्केस्ट्रा शो’ आयोजित करण्यात आला. संगीत आणि हौशी नृत्यामुळे उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव अजय माढेकर यांनी केले. गुरुनाथ सरमळकर यांनी छायाचित्रणाची जबाबदारी सांभाळली. महिला सदस्य रजनी कलोसे, स्वाती गावडे आणि निर्मला शिंदे यांनी मान्यवरांचे आदरातिथ्य केले. उपाध्यक्ष रमेश गायकवाड यांनी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता केली. अल्पोपहाराची व्यवस्था रंगा राव आणि दत्ताराम आंब्रे यांनी पाहिली.

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात उपस्थितांनी एकमेकांना शुभेच्छा देत कार्यक्रमाच्या आयोजनाचे कौतुक केले.

Tags: Bhalchandra Mane
Previous Post

बसच्या धडकेत २६ वर्षीय युवकाचा मृत्यू

Next Post

नोटीस काढूनही ग्रामसभा टळली; ग्रामसेवक संघटनेच्या बहिष्काराचे कारण पुढे

Related Posts

कुऱ्हा-मांडवा धरण प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या २५ वर्षांनंतरही प्रलंबित
Blog

कुऱ्हा-मांडवा धरण प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या २५ वर्षांनंतरही प्रलंबित

October 2, 2026
0
Blog

नोटीस काढूनही ग्रामसभा टळली; ग्रामसेवक संघटनेच्या बहिष्काराचे कारण पुढे

October 2, 2026
3
शेतकरी कुटुंबातील शिवप्रसाद बोडके यांची MBBS प्रवेशासाठी निवड
Blog

शेतकरी कुटुंबातील शिवप्रसाद बोडके यांची MBBS प्रवेशासाठी निवड

October 2, 2026
6
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी
Blog

महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी

October 2, 2026
8
Blog

खडकी बुरांडा येथे पथदिवे बंद; रात्री पायदळ जाणाऱ्या नागरिकांना त्रास

October 2, 2026
9
सावरगाव शिवारात सोयाबीनचे एकरी उत्पादन ७० किलोपर्यंत; शेतकरी संकटात
Blog

सावरगाव शिवारात सोयाबीनचे एकरी उत्पादन ७० किलोपर्यंत; शेतकरी संकटात

October 2, 2026
27
Next Post

नोटीस काढूनही ग्रामसभा टळली; ग्रामसेवक संघटनेच्या बहिष्काराचे कारण पुढे

ताज्या बातम्या

सरस्वती विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

सरस्वती विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

October 2, 2026
कुऱ्हा-मांडवा धरण प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या २५ वर्षांनंतरही प्रलंबित

कुऱ्हा-मांडवा धरण प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या २५ वर्षांनंतरही प्रलंबित

October 2, 2026

प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा; जमिनी व घरे बळकावणाऱ्यांवर कारवाईची मागणी

October 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In