• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कुऱ्हा-मांडवा धरण प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या २५ वर्षांनंतरही प्रलंबित

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 2, 2026
in Blog
0
कुऱ्हा-मांडवा धरण प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या २५ वर्षांनंतरही प्रलंबित
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

मोबदला, पुनर्वसन, घरकुल व मुलांना नोकरीची मागणी; महसूलमंत्र्यांशी संवाद साधणार

वाशिम प्रतिनिधी : वाशिम लघुपाटबंधारे विभागांतर्गत कुऱ्हा-मांडवा धरण प्रकल्पासाठी सन १९९५-९६ मध्ये कुऱ्हा व मांडवा गावातील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी शासनाला दिल्या. त्यावेळी प्रकल्पग्रस्तांना बाजारभावाप्रमाणे मोबदला देण्यासह कुटुंबातील पात्र व्यक्तींना शासकीय नोकरी, पुनर्वसन तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ देण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, धरणाचे काम पूर्ण होऊन २५ वर्षांहून अधिक काळ लोटला तरी अनेक मागण्या अद्याप प्रलंबित असल्याची तक्रार प्रकल्पग्रस्तांनी केली आहे.

RelatedPosts

नोटीस काढूनही ग्रामसभा टळली; ग्रामसेवक संघटनेच्या बहिष्काराचे कारण पुढे

नेरूळमध्ये आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा

शेतकरी कुटुंबातील शिवप्रसाद बोडके यांची MBBS प्रवेशासाठी निवड

जमिनी देताना शासनाकडून देण्यात आलेल्या आश्वासनांची पूर्तता झालेली नसल्याने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. प्रकल्पग्रस्त कुटुंबांना योग्य मोबदला, पुनर्वसन, घरकुल योजना तसेच इतर शासकीय योजनांचा लाभ मिळावा आणि प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

या मागण्यांसाठी कुऱ्हा-मांडवा लघुपाटबंधारे प्रकल्पग्रस्त संघटनेच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असल्याचे संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर बदू राठोड यांनी सांगितले.

दरम्यान, दि. ३ ऑक्टोबर रोजी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात येणार असून, यावेळी वाशिम जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त शेतकरी त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांकडे महसूल मंत्र्यांचे लक्ष वेधून त्यावर ठोस निर्णय घेण्याची मागणी करण्यात येणार आहे.

“धरणासाठी आमच्या जमिनी देऊन २५ वर्षांहून अधिक काळ झाला. त्यावेळी दिलेली आश्वासने अद्याप पूर्ण झालेली नाहीत. प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, घरकुल व शासकीय योजनांचा लाभ तसेच आमच्या मुलांना नोकरी मिळावी, ही आमची प्रमुख मागणी आहे,” असे कुऱ्हा-मांडवा लघुपाटबंधारे प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर बदू राठोड, मांडवा यांनी सांगितले.

Tags: Bhagwat Ghuge
Previous Post

प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा; जमिनी व घरे बळकावणाऱ्यांवर कारवाईची मागणी

Next Post

सरस्वती विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

Related Posts

Blog

नोटीस काढूनही ग्रामसभा टळली; ग्रामसेवक संघटनेच्या बहिष्काराचे कारण पुढे

October 2, 2026
16
नेरूळमध्ये आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा
Blog

नेरूळमध्ये आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा

October 2, 2026
11
शेतकरी कुटुंबातील शिवप्रसाद बोडके यांची MBBS प्रवेशासाठी निवड
Blog

शेतकरी कुटुंबातील शिवप्रसाद बोडके यांची MBBS प्रवेशासाठी निवड

October 2, 2026
19
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी
Blog

महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी

October 2, 2026
9
Blog

खडकी बुरांडा येथे पथदिवे बंद; रात्री पायदळ जाणाऱ्या नागरिकांना त्रास

October 2, 2026
10
सावरगाव शिवारात सोयाबीनचे एकरी उत्पादन ७० किलोपर्यंत; शेतकरी संकटात
Blog

सावरगाव शिवारात सोयाबीनचे एकरी उत्पादन ७० किलोपर्यंत; शेतकरी संकटात

October 2, 2026
27
Next Post
सरस्वती विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

सरस्वती विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

ताज्या बातम्या

सरस्वती विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

सरस्वती विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

October 2, 2026
कुऱ्हा-मांडवा धरण प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या २५ वर्षांनंतरही प्रलंबित

कुऱ्हा-मांडवा धरण प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या २५ वर्षांनंतरही प्रलंबित

October 2, 2026

प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा; जमिनी व घरे बळकावणाऱ्यांवर कारवाईची मागणी

October 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In