• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दिवेआगर समुद्रकिनारी दुर्घटना; आळंदीच्या आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 2, 2026
in Blog
0
दिवेआगर समुद्रकिनारी दुर्घटना; आळंदीच्या आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

समुद्रात उतरलेल्या विद्यार्थ्यांना प्रवाहाने ओढले; बचावकार्यादरम्यान सर्वांना बाहेर काढले, मात्र उपचारापूर्वीच मृत्यू

विशेष प्रतिनिधी

RelatedPosts

करजतच्या आखाड्यात आवासच्या मल्लांचा डंका!

रोडपालीतील स्विगी इन्स्टा मार्टमध्ये मुदतबाह्य, खराब खाद्यपदार्थांचा दावा; तक्रारीनंतर अन्न प्रशासनाची तपासणी

नवीन पनवेलमधील ‘हेवन थाई स्पा’वर पोलिसांचा छापा; पाच महिलांची सुटका

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ दिवेआगर समुद्रकिनारी गुरुवारी दुर्दैवी दुर्घटना घडली. समुद्रात उतरलेल्या आळंदी येथील आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे दिवेआगरसह आळंदी परिसरात शोककळा पसरली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील आळंदी येथील ‘विनर्स अकॅडमी’ या खासगी शिकवणी वर्गातील अकरावी व बारावी विज्ञान शाखेचे सुमारे ३० ते ४० विद्यार्थी पर्यटनासाठी दिवेआगर येथे आले होते. समुद्रकिनारी काही विद्यार्थी पाण्यात उतरले असताना समुद्राच्या प्रवाहामुळे आठ विद्यार्थी खोल पाण्यात ओढले गेल्याचे सांगण्यात येत आहे.

विद्यार्थी पाण्यात अडकल्याचे लक्षात येताच स्थानिक नागरिक, जीवरक्षक आणि पोलिसांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. सर्व आठ विद्यार्थ्यांना समुद्रातून बाहेर काढून बोरली प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

मृत विद्यार्थ्यांची नावे

१. यश किरण वानखेडे
२. सोहम तुकाराम भांडवलकर
३. तन्मय दत्तात्रय वाहिले
४. कौस्तुभ संदीप दौंड
५. कैवल्य वासनकर
६. राजवीर वहिले
७. प्रणव बनसोडे
८. सुमित अहिरे

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, महसूल प्रशासन आणि आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांशी प्रशासनाकडून संपर्क साधण्यात आला असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

या दुर्घटनेमुळे सहलीसाठी आलेले अन्य विद्यार्थी आणि शिक्षकांनाही मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, समुद्रकिनारी पर्यटकांनी पाण्यात उतरताना जीवरक्षक व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, समुद्रातील प्रवाह व पाण्याची खोली यांचा अंदाज नसताना खोल पाण्यात जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Previous Post

रोडपालीतील स्विगी इन्स्टा मार्टमध्ये मुदतबाह्य, खराब खाद्यपदार्थांचा दावा; तक्रारीनंतर अन्न प्रशासनाची तपासणी

Next Post

करजतच्या आखाड्यात आवासच्या मल्लांचा डंका!

Related Posts

करजतच्या आखाड्यात आवासच्या मल्लांचा डंका!
Blog

1
नवीन पनवेलमधील ‘हेवन थाई स्पा’वर पोलिसांचा छापा; पाच महिलांची सुटका
Blog

नवीन पनवेलमधील ‘हेवन थाई स्पा’वर पोलिसांचा छापा; पाच महिलांची सुटका

October 2, 2026
1
घरफोडी करणाऱ्या चौघांना खांदेश्वर पोलिसांकडून अटक; नऊ गुन्ह्यांची उकल
Blog

घरफोडी करणाऱ्या चौघांना खांदेश्वर पोलिसांकडून अटक; नऊ गुन्ह्यांची उकल

October 2, 2026
5
शिलालेखातील इतिहास; विसापूर तलावाची १२५ वर्षांची गौरवगाथा
Blog

शिलालेखातील इतिहास; विसापूर तलावाची १२५ वर्षांची गौरवगाथा

October 2, 2026
1
चांभुर्डी गावात दुष्काळामुळे करपलेल्या पिकांचे पंचनामे सुरू
Blog

चांभुर्डी गावात दुष्काळामुळे करपलेल्या पिकांचे पंचनामे सुरू

October 2, 2026
8
Next Post
करजतच्या आखाड्यात आवासच्या मल्लांचा डंका!

करजतच्या आखाड्यात आवासच्या मल्लांचा डंका!

ताज्या बातम्या

करजतच्या आखाड्यात आवासच्या मल्लांचा डंका!

करजतच्या आखाड्यात आवासच्या मल्लांचा डंका!

October 2, 2026
दिवेआगर समुद्रकिनारी दुर्घटना; आळंदीच्या आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

दिवेआगर समुद्रकिनारी दुर्घटना; आळंदीच्या आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

October 2, 2026
रोडपालीतील स्विगी इन्स्टा मार्टमध्ये मुदतबाह्य, खराब खाद्यपदार्थांचा दावा; तक्रारीनंतर अन्न प्रशासनाची तपासणी

रोडपालीतील स्विगी इन्स्टा मार्टमध्ये मुदतबाह्य, खराब खाद्यपदार्थांचा दावा; तक्रारीनंतर अन्न प्रशासनाची तपासणी

October 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In