• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

रोडपालीतील स्विगी इन्स्टा मार्टमध्ये मुदतबाह्य, खराब खाद्यपदार्थांचा दावा; तक्रारीनंतर अन्न प्रशासनाची तपासणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 2, 2026
in Blog
0
रोडपालीतील स्विगी इन्स्टा मार्टमध्ये मुदतबाह्य, खराब खाद्यपदार्थांचा दावा; तक्रारीनंतर अन्न प्रशासनाची तपासणी
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

कळंबोली प्रतिनिधी

कळंबोली-तळोजा जोडरस्त्यालगत रोडपाली येथील स्विगी इन्स्टा मार्टमध्ये कथितरित्या मुदतबाह्य व खराब खाद्यपदार्थ आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. ग्राहकांकडून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक रामदास शेवाळे यांनी शिवसैनिकांसह मार्टमध्ये पाहणी केली. त्यानंतर कळंबोली पोलिसांसह अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत तपासणी केली.

RelatedPosts

करजतच्या आखाड्यात आवासच्या मल्लांचा डंका!

दिवेआगर समुद्रकिनारी दुर्घटना; आळंदीच्या आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

नवीन पनवेलमधील ‘हेवन थाई स्पा’वर पोलिसांचा छापा; पाच महिलांची सुटका

पाहणीदरम्यान मुदत संपलेली बिस्किटे, किड लागलेला तांदूळ, बुरशी आलेली काजू कतली, खराब आईस्क्रीम, पनीर, पराठे व रोटी तसेच सीताफळे, टोमॅटो आणि अन्य भाजीपाला खराब अवस्थेत आढळल्याचा दावा करण्यात आला. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित खाद्यपदार्थ व मालाची तपासणी करून आवश्यक नोंदी केल्याची माहिती आहे.

ग्राहकांच्या तक्रारीनंतर रामदास शेवाळे यांनी प्रेम डांगे, गणेश ओतारे, कुमार नलवडे यांच्यासह मार्टमध्ये पाहणी केली. वस्तूंच्या गुणवत्तेबाबत विचारणा झाल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक अभयसिंह नाईक, अभयसिंह काळे यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाच्या प्रभारी अधिकारी अंकिता गावडे यांनाही पाचारण करण्यात आले.

‘घरपोच’ खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेचा प्रश्न ऐरणीवर

ऑनलाईन पद्धतीने किराणा व खाद्यपदार्थ घरपोच मागविण्याचे प्रमाण वाढत असताना वस्तूंची मुदत, पॅकेजची स्थिती, साठवणूक आणि गुणवत्ता यांची नियमित तपासणी होणे आवश्यक असल्याचा मुद्दा या प्रकरणामुळे पुन्हा चर्चेत आला आहे.

“ऑनलाईन वस्तू मागविताना ग्राहक अनेकदा वस्तूंची गुणवत्ता तपासू शकत नाहीत. अन्नपदार्थ, फळे आणि भाज्यांच्या गुणवत्तेचा थेट परिणाम आरोग्यावर होऊ शकतो. रोडपालीतील तपासणीत गंभीर बाबी आढळल्याचा दावा असून, नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे,” असे रामदास शेवाळे यांनी सांगितले. या संदर्भात महापालिका आयुक्तांकडेही तक्रार करण्याचे त्यांनी सांगितले.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी शेवाळे यांनी केली आहे. यावेळी त्यांच्या समवेत भाजप युवा नेते अमर ठाकूर, भाई जगदीश गायकवाड यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणीत नेमके काय निष्पन्न होते आणि संबंधित खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत अंतिम निष्कर्ष काय निघतो, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

नवीन पनवेलमधील ‘हेवन थाई स्पा’वर पोलिसांचा छापा; पाच महिलांची सुटका

Next Post

दिवेआगर समुद्रकिनारी दुर्घटना; आळंदीच्या आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

Related Posts

करजतच्या आखाड्यात आवासच्या मल्लांचा डंका!
Blog

करजतच्या आखाड्यात आवासच्या मल्लांचा डंका!

October 2, 2026
4
दिवेआगर समुद्रकिनारी दुर्घटना; आळंदीच्या आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू
Blog

दिवेआगर समुद्रकिनारी दुर्घटना; आळंदीच्या आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

October 2, 2026
5
नवीन पनवेलमधील ‘हेवन थाई स्पा’वर पोलिसांचा छापा; पाच महिलांची सुटका
Blog

नवीन पनवेलमधील ‘हेवन थाई स्पा’वर पोलिसांचा छापा; पाच महिलांची सुटका

October 2, 2026
1
घरफोडी करणाऱ्या चौघांना खांदेश्वर पोलिसांकडून अटक; नऊ गुन्ह्यांची उकल
Blog

घरफोडी करणाऱ्या चौघांना खांदेश्वर पोलिसांकडून अटक; नऊ गुन्ह्यांची उकल

October 2, 2026
5
शिलालेखातील इतिहास; विसापूर तलावाची १२५ वर्षांची गौरवगाथा
Blog

शिलालेखातील इतिहास; विसापूर तलावाची १२५ वर्षांची गौरवगाथा

October 2, 2026
2
चांभुर्डी गावात दुष्काळामुळे करपलेल्या पिकांचे पंचनामे सुरू
Blog

चांभुर्डी गावात दुष्काळामुळे करपलेल्या पिकांचे पंचनामे सुरू

October 2, 2026
15
Next Post
दिवेआगर समुद्रकिनारी दुर्घटना; आळंदीच्या आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

दिवेआगर समुद्रकिनारी दुर्घटना; आळंदीच्या आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

ताज्या बातम्या

करजतच्या आखाड्यात आवासच्या मल्लांचा डंका!

करजतच्या आखाड्यात आवासच्या मल्लांचा डंका!

October 2, 2026
दिवेआगर समुद्रकिनारी दुर्घटना; आळंदीच्या आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

दिवेआगर समुद्रकिनारी दुर्घटना; आळंदीच्या आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

October 2, 2026
रोडपालीतील स्विगी इन्स्टा मार्टमध्ये मुदतबाह्य, खराब खाद्यपदार्थांचा दावा; तक्रारीनंतर अन्न प्रशासनाची तपासणी

रोडपालीतील स्विगी इन्स्टा मार्टमध्ये मुदतबाह्य, खराब खाद्यपदार्थांचा दावा; तक्रारीनंतर अन्न प्रशासनाची तपासणी

October 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In