• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

२२ सप्टेंबरचा जाचक जीआर रद्द करा; अन्यथा १ ऑक्टोबरपासून बेमुदत काम बंद

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 3, 2026
in Blog
0
२२ सप्टेंबरचा जाचक जीआर रद्द करा; अन्यथा १ ऑक्टोबरपासून बेमुदत काम बंद
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

रोजगार सहाय्यकांचा तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांना निवेदनातून इशारा

फलटण, दि. ३० सप्टेंबर २०२६ (प्रतिनिधी) : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) कामकाजासाठी गावपातळीवर कार्यरत असलेल्या रोजगार सहाय्यकांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सहाय्यक विकास युनियनच्या वतीने फलटण तहसीलदार तसेच पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. २२ सप्टेंबर २०२६ रोजी जारी करण्यात आलेला शासन निर्णय रद्द करावा, तसेच प्रलंबित मानधन अदा करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

RelatedPosts

सामान्य कार्यकर्त्यापासून विधानसभेपर्यंतचा प्रवास; ‘माऊली आबा’ या नावामागची लोकसंपर्काची कहाणी

शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी लहुजी शितोळे; महिला संघाच्या अध्यक्षपदी आरती दरेकर

जालन्याचे राजू काणे एमसीएच्या टुर्नामेंट कमिटीच्या चेअरमनपदी

युनियनच्या म्हणण्यानुसार, रोजगार सहाय्यक गेल्या २४ महिन्यांपासून मानधन मिळाले नसतानाही मनरेगा योजनेच्या अंमलबजावणीसाठी आपली जबाबदारी पार पाडत आहेत. मात्र, शासनाने २२ सप्टेंबर २०२६ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयामुळे रोजगार सहाय्यकांमध्ये नाराजी निर्माण झाली असून, हा निर्णय जाचक असल्याचा आरोप युनियनने केला आहे.

रोजगार सहाय्यकांच्या प्रमुख मागण्या

युनियनने निवेदनातून पुढील मागण्या केल्या आहेत—

  • २२ सप्टेंबर २०२६ रोजीचा शासन निर्णय तातडीने रद्द करावा.
  • ३ ऑक्टोबर २०२४ चा शासन निर्णय लागू करून त्यानुसार ऑक्टोबर २०२४पासूनचे थकीत मानधन अदा करावे.
  • रोजगार सहाय्यकांना सुरक्षा कवच व आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
  • मागण्या मान्य न झाल्यास १ ऑक्टोबर २०२६पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्यात येईल.

युनियनने निवेदनात म्हटले आहे की, ग्रामीण भागातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार सहाय्यक महत्त्वाची भूमिका बजावत असताना त्यांनाच दीर्घकाळ मानधन मिळालेले नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबांच्या दैनंदिन, शैक्षणिक आणि प्रापंचिक खर्चावर परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

“२२ सप्टेंबर २०२६चा शासन निर्णय रद्द करून ३ ऑक्टोबर २०२४च्या शासन निर्णयानुसार ऑक्टोबर २०२४ ते सप्टेंबर २०२६ या कालावधीतील थकीत मानधन रोजगार सहाय्यकांच्या वैयक्तिक खात्यावर जमा करावे. मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा युनियनने दिला आहे.

यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सहाय्यक विकास युनियनचे फलटण तालुका अध्यक्ष संतोष सुळ, उपाध्यक्ष कालिदास गोडसे, सचिव अमोल गावडे, कोषाध्यक्ष गौतम भोसले, कार्याध्यक्ष मंगेश शिंदे, सहसचिव सुधीर यादव, सहकोषाध्यक्ष राजेंद्र गोफणे, महिला संघटक रोहिणी कदम, सल्लागार बापूराव घुले, गटप्रमुख शरद जाधव, प्रवक्ते सागर पिसाळ, सोशल मीडिया प्रमुख प्रमोद खरात, दिनेश कांबळे आदी रोजगार सहाय्यक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: Nitin Sul
Previous Post

कायगावच्या झोपडपट्टीत दोन दिवसांपासून अंधार!

Next Post

मलका गुडा येथे ग्रामस्वच्छता मोहिमेत ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

Related Posts

Blog

सामान्य कार्यकर्त्यापासून विधानसभेपर्यंतचा प्रवास; ‘माऊली आबा’ या नावामागची लोकसंपर्काची कहाणी

October 3, 2026
1
शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी लहुजी शितोळे; महिला संघाच्या अध्यक्षपदी आरती दरेकर
Blog

शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी लहुजी शितोळे; महिला संघाच्या अध्यक्षपदी आरती दरेकर

October 3, 2026
1
जालन्याचे राजू काणे एमसीएच्या टुर्नामेंट कमिटीच्या चेअरमनपदी
Blog

जालन्याचे राजू काणे एमसीएच्या टुर्नामेंट कमिटीच्या चेअरमनपदी

October 3, 2026
1
मलका गुडा येथे ग्रामस्वच्छता मोहिमेत ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग
Blog

मलका गुडा येथे ग्रामस्वच्छता मोहिमेत ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

October 3, 2026
1
Blog

कायगावच्या झोपडपट्टीत दोन दिवसांपासून अंधार!

October 3, 2026
1
Blog

वनराई बंधाऱ्यांप्रमाणे जलजीवन मिशनची कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट कधी निश्चित करणार?

October 3, 2026
1
Next Post
मलका गुडा येथे ग्रामस्वच्छता मोहिमेत ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

मलका गुडा येथे ग्रामस्वच्छता मोहिमेत ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

ताज्या बातम्या

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

October 3, 2026
सिसा येथे शेतजमीन नावावर करण्याच्या गैरसमजातून दोघांना मारहाण

सिसा येथे शेतजमीन नावावर करण्याच्या गैरसमजातून दोघांना मारहाण

October 3, 2026

सामान्य कार्यकर्त्यापासून विधानसभेपर्यंतचा प्रवास; ‘माऊली आबा’ या नावामागची लोकसंपर्काची कहाणी

October 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In