• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मलका गुडा येथे ग्रामस्वच्छता मोहिमेत ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 3, 2026
in Blog
0
मलका गुडा येथे ग्रामस्वच्छता मोहिमेत ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

मंदिर, शाळा, ग्रामपंचायत परिसरासह रस्त्यांची स्वच्छता; राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगे महाराजांच्या विचारांना उजाळा

मलका गुडा, ता. माहूर, जि. नांदेड | दि. १ सप्टेंबर २०२६ | प्रतिनिधी : राष्ट्रीय स्वच्छता अभियानांतर्गत मलका गुडा येथे ग्रामस्वच्छता मोहीम उत्साहात राबविण्यात आली. महात्मा गांधी यांच्या स्वच्छतेच्या विचारांपासून प्रेरणा घेत ग्रामस्थांनी गावातील विविध सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता केली.

RelatedPosts

सामान्य कार्यकर्त्यापासून विधानसभेपर्यंतचा प्रवास; ‘माऊली आबा’ या नावामागची लोकसंपर्काची कहाणी

शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी लहुजी शितोळे; महिला संघाच्या अध्यक्षपदी आरती दरेकर

जालन्याचे राजू काणे एमसीएच्या टुर्नामेंट कमिटीच्या चेअरमनपदी

या मोहिमेत ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद शाळा तसेच गावातील सरदार पाप नागोड मंदिर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मंदिर, श्री संतोषी माता मंदिर आणि श्री हनुमान मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली. याशिवाय गावातील रस्ते व सार्वजनिक परिसरही स्वच्छ करण्यात आला.

या स्वच्छता मोहिमेत मलका गुडा ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुमित कन्नलवार, ग्रामपंचायत सदस्य आनंदा बोडलवार पाटील, भारत मडावी, पत्रकार संतोष निळकंठवार, मिलिंद पडलवार, गजानन कन्नलवार, अजय किनाके, उत्तम देवकर, गंगाधर राजुरकर, भारत सिडाम, प्रकाश आत्राम यांच्यासह ग्रामस्थांनी सहभाग घेतला.

यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगे महाराज यांच्या स्वच्छता व समाजप्रबोधनाच्या विचारांना उजाळा देण्यात आला. भारत मडावी यांनी संतांच्या विचारांची माहिती उपस्थित ग्रामस्थांना दिली. स्वच्छ गाव, सुंदर गाव आणि निरोगी गावासाठी प्रत्येक नागरिकाने स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारावी, असा संदेश यावेळी देण्यात आला.

गावातील सार्वजनिक ठिकाणे, मंदिरे, शाळा आणि रस्त्यांची स्वच्छता करण्यासाठी ग्रामस्थांनी एकत्रितपणे पुढाकार घेतल्याने मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमासाठी ग्रामस्थांनी सहभागी सर्वांचे आभार मानले.

Previous Post

२२ सप्टेंबरचा जाचक जीआर रद्द करा; अन्यथा १ ऑक्टोबरपासून बेमुदत काम बंद

Next Post

जालन्याचे राजू काणे एमसीएच्या टुर्नामेंट कमिटीच्या चेअरमनपदी

Related Posts

Blog

सामान्य कार्यकर्त्यापासून विधानसभेपर्यंतचा प्रवास; ‘माऊली आबा’ या नावामागची लोकसंपर्काची कहाणी

October 3, 2026
1
शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी लहुजी शितोळे; महिला संघाच्या अध्यक्षपदी आरती दरेकर
Blog

शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी लहुजी शितोळे; महिला संघाच्या अध्यक्षपदी आरती दरेकर

October 3, 2026
1
जालन्याचे राजू काणे एमसीएच्या टुर्नामेंट कमिटीच्या चेअरमनपदी
Blog

जालन्याचे राजू काणे एमसीएच्या टुर्नामेंट कमिटीच्या चेअरमनपदी

October 3, 2026
1
२२ सप्टेंबरचा जाचक जीआर रद्द करा; अन्यथा १ ऑक्टोबरपासून बेमुदत काम बंद
Blog

२२ सप्टेंबरचा जाचक जीआर रद्द करा; अन्यथा १ ऑक्टोबरपासून बेमुदत काम बंद

October 3, 2026
1
Blog

कायगावच्या झोपडपट्टीत दोन दिवसांपासून अंधार!

October 3, 2026
1
Blog

वनराई बंधाऱ्यांप्रमाणे जलजीवन मिशनची कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट कधी निश्चित करणार?

October 3, 2026
1
Next Post
जालन्याचे राजू काणे एमसीएच्या टुर्नामेंट कमिटीच्या चेअरमनपदी

जालन्याचे राजू काणे एमसीएच्या टुर्नामेंट कमिटीच्या चेअरमनपदी

ताज्या बातम्या

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

October 3, 2026
सिसा येथे शेतजमीन नावावर करण्याच्या गैरसमजातून दोघांना मारहाण

सिसा येथे शेतजमीन नावावर करण्याच्या गैरसमजातून दोघांना मारहाण

October 3, 2026

सामान्य कार्यकर्त्यापासून विधानसभेपर्यंतचा प्रवास; ‘माऊली आबा’ या नावामागची लोकसंपर्काची कहाणी

October 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In