• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव उपकेंद्राला पहिले NQAS मानांकन; ८९.९४ टक्के गुणांसह मानाचा तुरा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 3, 2026
in Blog
0
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

आयुष्मान आरोग्य मंदिर कुंभारगावचे यश; संपूर्ण आरोग्य पथकाच्या एकजुटीचे फलित

इंदापूर प्रतिनिधी : प्राथमिक आरोग्य केंद्र शेटफळगडे अंतर्गत येणाऱ्या कुंभारगाव उपकेंद्र (आयुष्मान आरोग्य मंदिर, ता. इंदापूर, जि. पुणे) याला राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानक अर्थात NQAS मध्ये ८९.९४ टक्के गुण मिळाले आहेत. इंदापूर तालुक्यात NQAS मानांकन मिळविणारे हे पहिलेच उपकेंद्र ठरले असून, या यशामुळे आरोग्य विभागाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

RelatedPosts

‘रोजगार मागणारे नव्हे, रोजगार देणारे बना’ — पिंटू पाटील निंबाळकर

अष्टविनायक नवरात्र उत्सव मंडळाची जय्यत तयारी; युवा शक्तीवर सोपविली उत्सवाची जबाबदारी

साई विद्यालय वंधली येथे गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी

NQAS मानांकनाची घोषणा जिल्हा व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये झाल्यानंतर कुंभारगाव उपकेंद्राने हे आव्हान गांभीर्याने स्वीकारले. जिल्हा परिषद पुणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे, जिल्हा माताबाल संगोपन अधिकारी तथा NQAS नोडल अधिकारी डॉ. दीपक साळुंखे आणि इंदापूर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेखा पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली तयारीला सुरुवात करण्यात आली.

नवीन उपकेंद्र असल्याने सुरुवातीपासून विविध पातळ्यांवर काम करत समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. कीर्ती कैलास व्यवहारे यांनी सर्वांच्या सहकार्याने उपकेंद्राच्या कामकाजात आवश्यक सुधारणा केल्या. स्वच्छता, रेकॉर्ड, सेवा गुणवत्ता, आवश्यक सुविधा तसेच NQAS निकषांची पूर्तता करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले.

या प्रवासात आरोग्य विस्तार अधिकारी संतोष बाबर, तालुका आरोग्य सहाय्यक आप्पा बंडगर, वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल कारंडे व डॉ. मदने यांचे मार्गदर्शन लाभले. आरोग्य सेवक बाबासाहेब मोरे यांनी सुरुवातीपासून सातत्याने पाठपुरावा व प्रोत्साहन दिले.

आरोग्य सेविका स्वाती लोंढे यांनी लसीकरण तसेच गर्भवती महिलांना गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासोबत आशा स्वयंसेविका वैशाली मोरे, कोमल कोळेकर, अनिता काशीद, जयश्री परकाळे आणि रंजना कुताळ यांच्या सहकार्याने स्वच्छता, रेकॉर्ड तयार करणे व प्रश्नोत्तर सराव आदी कामे पूर्ण केली.

याशिवाय CHO डॉ. मृदुला जगताप, रेणुका कुलकर्णी, आरोग्य सहाय्यक भोपळे, चाबुकस्वार, पवार, आरोग्य सहायिका बीटे सिस्टर व जाधव सिस्टर, क्लार्क मोरे मॅडम, प्रयोगशाळा अधिकारी पाळंदे मॅडम, फार्मसी ऑफिसर मानसी, ब्लॉक फॅसिलिटेटर शितल गायकवाड, आरोग्य सेवक प्रशांत रणधीर, पाठक दादा, गणेश बंडगर, मारुती गायकवाड तसेच मयुरेश घडशी यांनी महत्त्वपूर्ण सहकार्य केले. सलग १५ दिवस उपकेंद्रात राहून बोर्ड लावण्यापासून दस्तऐवज तयार करण्यापर्यंत विविध कामांमध्ये त्यांनी सहभाग घेतला.

ग्रामपंचायत कुंभारगावचे पदाधिकारी, ग्रामसेविका आणि ग्रामस्थांनी दिलेल्या आर्थिक मदतीबरोबरच मानसिक पाठबळाबद्दलही आरोग्य विभागाच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. तसेच रोटरी क्लब ऑफ भिगवणच्या वतीने आयुष्मान आरोग्य मंदिर कुंभारगाव परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. NQAS मानांकनासाठी आवश्यक हर्बल गार्डन तयार करण्यासाठीही क्लबचे सहकार्य लाभले.

या यशाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना, “हे यश एकट्या व्यक्तीचे नसून संपूर्ण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या टीमच्या एकजुटीचे फलित आहे,” अशी भावना व्यक्त करण्यात आली.

Previous Post

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न

Next Post

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

Related Posts

Blog

‘रोजगार मागणारे नव्हे, रोजगार देणारे बना’ — पिंटू पाटील निंबाळकर

October 3, 2026
0
Blog

अष्टविनायक नवरात्र उत्सव मंडळाची जय्यत तयारी; युवा शक्तीवर सोपविली उत्सवाची जबाबदारी

October 3, 2026
17
साई विद्यालय वंधली येथे गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी
Blog

साई विद्यालय वंधली येथे गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी

October 3, 2026
18
खेडमध्ये कुणबी समाजोन्नती संघाचा १०६ वा वर्धापन दिन उत्साहात; विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव
Blog

खेडमध्ये कुणबी समाजोन्नती संघाचा १०६ वा वर्धापन दिन उत्साहात; विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव

October 3, 2026
94
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची दगडवाडी येथे दुष्काळी पाहणी
Blog

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची दगडवाडी येथे दुष्काळी पाहणी

October 3, 2026
8
Blog

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण

October 3, 2026
13
Next Post

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

ताज्या बातम्या

‘रोजगार मागणारे नव्हे, रोजगार देणारे बना’ — पिंटू पाटील निंबाळकर

October 3, 2026
तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

October 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In