दि. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री मा. गुलाबराव पाटील यांच्या दालनात अक्कलकुवा–अक्राणी तालुक्यातील पाणीटंचाईच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
या बैठकीस राज्याचे पाणीपुरवठा मंत्री मा. गुलाबराव पाटील, अक्कलकुवा–अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. आमश्या दादा पाडवी, राज्याचे पाणीपुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव तसेच नंदुरबार जिल्ह्यातील पाणीपुरवठा विभाग व जल जीवन मिशनचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
बैठकीमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग, जळगाव उपविभाग, नंदुरबार तसेच जल जीवन मिशन अंतर्गत अक्कलकुवा–अक्राणी मतदारसंघासाठी महत्त्वपूर्ण पाणीपुरवठा योजनांवर चर्चा करण्यात आली.
यामध्ये नर्मदा नदी बारमाही जलस्रोत योजनेसाठी ₹८४४.९५ कोटी तसेच हंगामी नदी/हंगामी साठवण धोरणांतर्गत ₹७१७.७४ कोटी अशा मोठ्या निधीच्या योजनांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करून अक्कलकुवा–अक्राणी मतदारसंघातील गावांना नियमित व शाश्वत पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच वस्ती समावेशन धोरणाच्या माध्यमातून गावांसोबतच सर्व वस्त्यांपर्यंत १००% पाणीपुरवठा पोहोचविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
या योजनांची योग्य आणि वेळेत अंमलबजावणी झाल्यास अक्कलकुवा–अक्राणी मतदारसंघातील अनेक वर्षांपासूनचा पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी दूर होण्यास मोठी मदत होणार आहे.
अक्कलकुवा–अक्राणीच्या जनतेसाठी ही अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक










