• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

तानाजी गायकवाड खून प्रकरणी मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात; साथीदार फरार, एका दिवसात मुरूम पोलिसांनी लावला छडा

Pratik Tidke by Pratik Tidke
October 8, 2026
in Blog
0
तानाजी गायकवाड खून प्रकरणी मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात; साथीदार फरार, एका दिवसात मुरूम पोलिसांनी लावला छडा
0
SHARES
18
VIEWS
Ad 1

अनैतिक संबंधातूनच तानाजी गायकवाडचा खून
जाब विचारण्यासाठी शेतात गेल्याने वाद; दगड व फरशीने ठेचले
मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात; साथीदार फरार, ३ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी

RelatedPosts

२०११ पासूनची परंपरा कायम; ‘बाल मित्र मंडळा’कडून नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी

प्रवाशांनी एसटी तीर्थाटन योजनेचा लाभ घ्यावा.

राज्यस्तरीय अण्णा भाऊ साठे विचार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक तथा प्रसिद्ध साहित्यिक शिवा कांबळे सर.

धराशिव जिल्हा प्रतिनिधी :-लाडलेसाब नदाफ
उमरगा तालुक्यातील भुयार चिंचोली येथे ३५ वर्षीय तानाजी गायकवाड यांचा दगड व फरशीने ठेचून खून केल्याची घटना बुधवार, दि. ३० सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली होती. या प्रकरणाचा अवघ्या २४ तासांत मुरूम पोलिसांनी छडा लावला असून, अनैतिक संबंधाच्या कारणातून हा खून झाल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.

घटनेची माहिती मिळताच मुरूम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. यावेळी तानाजी गायकवाड यांचा दगड व फरशीने ठेचून खून करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला.
प्राथमिक तपासादरम्यान पोलिसांना काटेवाडी येथील निशांत अंकुश पांढरे याच्यावर संशय आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान निशांत याने मित्र आशिष आण्णाराव गुरुळे याच्या मदतीने मंगळवारी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास तानाजी गायकवाड यांचा खून केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणातील आशिष गुरुळे हा सध्या फरार असून, पोलिस त्याचा शोध मुरूम पोलिस घेत आहेत.
पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मयत तानाजी गायकवाड यांच्या पत्नीशी निशांत पांढरे याचे गेल्या काही महिन्यांपासून संबंध होते.

या संबंधांना तानाजी यांचा विरोध होता. याबाबत जाब विचारण्यासाठी तानाजी हे निशांतच्या शेतात गेले होते. त्यावेळी दोघांमध्ये जोरदार वाद झाला. या वादातून निशांत व त्याचा साथीदार आशिष यांनी तानाजी यांच्यावर दगड व फरशीने हल्ला केल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.
दरम्यान, जिल्हा पोलिस अधीक्षक रितू खोकर व उमरगा उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत संपते यांच्या मार्गदर्शनाखाली मुरूमचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश पाटील व त्यांच्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या २४ तासांत या खून प्रकरणाचा उलगडा केला.
मुख्य आरोपी निशांत पांढरे याला न्यायालयात हजर केले असता त्याला ३ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. फरार आरोपी आशिष आण्णाराव गुरुळे याचा शोध सुरू असून, पुढील तपास मुरूम पोलिस करीत आहेत.

Previous Post

ढालगावातील वीज समस्येवर मा. खा. संजयकाका पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; नागरिकांतून समाधान व्यक्त

Next Post

प्रशासनाचे दुर्लक्ष मोकाट कुत्र्यांचा नागरिकांना त्रास……..

Related Posts

२०११ पासूनची परंपरा कायम; ‘बाल मित्र मंडळा’कडून नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी
Blog

२०११ पासूनची परंपरा कायम; ‘बाल मित्र मंडळा’कडून नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी

October 8, 2026
0
प्रवाशांनी एसटी तीर्थाटन योजनेचा लाभ घ्यावा.
Blog

प्रवाशांनी एसटी तीर्थाटन योजनेचा लाभ घ्यावा.

October 8, 2026
1
राज्यस्तरीय अण्णा भाऊ साठे विचार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक तथा प्रसिद्ध साहित्यिक शिवा कांबळे सर.
Blog

राज्यस्तरीय अण्णा भाऊ साठे विचार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक तथा प्रसिद्ध साहित्यिक शिवा कांबळे सर.

October 8, 2026
2
: भजलो प्यारे भजन सीताराम भक्त मंडळातर्फे पद्मश्री संत रमेश बाबा यांना भावपूर्ण श्रद्धांजली
Blog

: भजलो प्यारे भजन सीताराम भक्त मंडळातर्फे पद्मश्री संत रमेश बाबा यांना भावपूर्ण श्रद्धांजली

October 8, 2026
4
पद्मश्री नाना पाटेकर यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीसह महाराष्ट्रावर शोककळा : खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, पालकमंत्री अ‍ॅड. आकाश फुंडकर यांची भावपूर्ण श्रद्धांजली
Blog

पद्मश्री नाना पाटेकर यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीसह महाराष्ट्रावर शोककळा : खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, पालकमंत्री अ‍ॅड. आकाश फुंडकर यांची भावपूर्ण श्रद्धांजली

October 8, 2026
4
Blog

ट्रिगर वगळल्यामुळे अग्रिम मिळण्यात येणाऱ्या अडचणीचा ॲड.भोरे यांनी या आधीच पत्रकार परिषदेत केला होता उल्लेख.

October 8, 2026
4
Next Post

प्रशासनाचे दुर्लक्ष मोकाट कुत्र्यांचा नागरिकांना त्रास……..

ताज्या बातम्या

२०११ पासूनची परंपरा कायम; ‘बाल मित्र मंडळा’कडून नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी

२०११ पासूनची परंपरा कायम; ‘बाल मित्र मंडळा’कडून नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी

October 8, 2026
प्रवाशांनी एसटी तीर्थाटन योजनेचा लाभ घ्यावा.

प्रवाशांनी एसटी तीर्थाटन योजनेचा लाभ घ्यावा.

October 8, 2026
राज्यस्तरीय अण्णा भाऊ साठे विचार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक तथा प्रसिद्ध साहित्यिक शिवा कांबळे सर.

राज्यस्तरीय अण्णा भाऊ साठे विचार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक तथा प्रसिद्ध साहित्यिक शिवा कांबळे सर.

October 8, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In