जत प्रतिनिधी | जत शहरात सकल नाभिक समाज संघटनेच्या वतीने शिवरत्न जिवाजी महाले यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवार, दि. ९ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता, वीर शिवाजी काशीद उद्यान, विधाननगर, जत येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळ, मुंबईचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. सयाजी (मामा) झुंजार हे राहणार आहेत. तर जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री. गोपीचंद पडळकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
यावेळी नगराध्यक्ष डॉ. रविंद्र आरळी, प्रा. सोमनाथ साळुंखे यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. प्रतिमा पूजन, दीपप्रज्वलन व मार्गदर्शन होणार आहे.
नाभिक समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेने केले आहे.








