अकोला : भजलो प्यारे भजन सीताराम भक्त मंडळाच्या वतीने बरसाना येथील गोसेवा आणि राधा राणी सेवा करणारे संत, पर्यावरण संरक्षण आणि ब्रज 84 कोस यात्रा काढणारे, हजारो भक्तांना विनामूल्य सेवा देणारे, देशातील सर्वात मोठी गौशाळा आणि राधा राणीचा महल बनवून नियमित भजन संध्या व अन्नदान करणारे पद्मश्री संत रमेश बाबा जी महाराज यांना मोठ्या राम मंदिरात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी गिरीश जोशी यांनी सांगितले की, “त्यांचे दर्शन व आशीर्वाद घेण्याचा लाभ मिळाला होता. त्यांच्या रूममध्ये 130 फूट लांब अखंड भागवत पाठ सतत सुरू असायचा. हजारो भक्तांचा परिवार असणारे आणि उत्कृष्ट मॅनेजमेंट करणारे, श्रद्धा, विश्वास आणि परंपरा संस्कृतीचे प्रतीक असलेल्या संताच्या निधनाने फार मोठी हानी झाली आहे.”
गिरीराज तिवारी व हरीश चौधरी यांनी यात्रेमधील अनुभव कथन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुमनदेवी अग्रवाल होत्या. यावेळी किसन गोपाल पुरोहित, एड. महेंद्र पुरोहित, प्रशांत लोहिया, अजय गुल्हाने, संजय अग्रवाल, नितीन ढोले, प्रकाश भुसारी, शीला तिवारी चौधरी, शशिकला पाटील, विशाल लड्डा, माधव मानकर, मनोहर मानकर, मनीष गावंडे, विनायक सांडिल्य गुरुजी, एड. आनंद रानडे, संगीता पाटील, राधा जाधव, रितेश पालीवाल आदी उपस्थित होते.
पद्मश्री संत रमेश बाबा जी महाराज यांचे जीवन कार्य
गोलोकगमन : 6 ऑक्टोबर 2026 रोजी बरसाना स्थित मान मंदिर आश्रम, मथुरा येथे 90 व्या वर्षी गोलोकगमन झाले. त्यांनी संपूर्ण जीवन राधा राणीची भक्ती, गौसेवा आणि पर्यावरण संरक्षणासाठी समर्पित केले.
- जन्म : 1938 मध्ये प्रयागराज (उ.प्र.) येथे प्रतिष्ठित परिवारात. पिता प्रसिद्ध ज्योतिषाचार्य पं. बलदेव प्रसाद शुक्ल, माता हेमेश्वरी देवी.
- ब्रज आगमन : वयाच्या 15-16 व्या वर्षी (1953-54) सर्व सुख-सुविधा सोडून बरसाना येथे आले आणि गहवर वनात कठीण साधना केली. राधा राणी मंदिरात मृदंग वाजवून राधा नामाचा प्रचार केला.
- मान मंदिर आश्रम : बरसाना के ब्रह्मांचल पर्वत आणि गहवर वनाजवळील मान मंदिर ही त्यांची साधनेची मुख्य केंद्र होते.
- गौ सेवा (माताजी गौशाला) : 2007 मध्ये 2 गायींपासून सुरू केलेली गौशाळा आज 60,000+ गोवंश सांभाळणारी देशातील सर्वात मोठी गौशाळा आहे. ही बिना सरकारी अनुदानाने चालते.
- पद्मश्री सम्मान : ब्रजच्या पहाड्या, प्राचीन कुंड, जंगल आणि पर्यावरण संरक्षणासाठी 2019 मध्ये पद्मश्रीने सन्मानित. ब्रज सीमा न सोडण्याच्या संकल्पामुळे त्यांनी दिल्लीला न जाता बरसानातच हा सन्मान स्वीकारला होता.
- ब्रज 84 कोस यात्रा : 1968 मध्ये त्यांनी ही यात्रा पुनर्जीवित केली. दरवर्षी 20-22 हजार श्रद्धालू देश-विदेशातून निःशुल्क सहभागी होतात. यात्रा मान मंदिरापासून सुरू होते आणि ब्रज संस्कृती, संत प्रवचन, राधा-कृष्ण भजनांचा प्रवाह असतो.
- पर्यावरण योगदान : अवैध खनन विरुद्ध 2007 मध्ये 22 हजार यात्रेकरूंसह महापडाव, त्यामुळे 5,253 हेक्टर पहाडी क्षेत्र आरक्षित वन घोषित झाले आणि 2008 मध्ये सुप्रीम कोर्टाने खननावर बंदी घातली. यमुना मुक्ति अभियानही चालवले.











