खेड : तालुकास्तरीय विविध स्पर्धांमध्ये कुणबी शिक्षण प्रसारक संस्था, खेड, मुंबई अंतर्गत विविध शाखांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत उल्लेखनीय कामगिरी केली. विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवत संस्थेच्या शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील लौकिकात भर घातली आहे.
विद्यार्थ्यांनी मिळविलेले हे यश त्यांच्या मेहनत, जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण सरावाचे फलित आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी आवश्यक मार्गदर्शन, प्रशिक्षण व प्रोत्साहन देणाऱ्या शिक्षकांचेही या यशात महत्त्वपूर्ण योगदान आहे.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. तु. ल. डफळे साहेब, सचिव श्री. सुधीर वैराग साहेब यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी भविष्यात जिल्हा व राज्यस्तरावरही उत्तम कामगिरी करून संस्थेचे नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.
तालुकास्तरीय स्पर्धांमध्ये मिळविलेल्या या यशामुळे विद्यार्थी, शिक्षक, पालक व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.










