• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कळंबोली SBI सर्कलवर वाहतूक कोंडीचा विळखा; CNGच्या वाहनांच्या रांगा ठरताहेत डोकेदुखी

Pratik Tidke by Pratik Tidke
October 8, 2026
in Blog
0
कळंबोली SBI सर्कलवर वाहतूक कोंडीचा विळखा; CNGच्या वाहनांच्या रांगा ठरताहेत डोकेदुखी
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

कळंबोली प्रतिनिधी |श्रीनाथ(गणेश) लाड: कळंबोली येथील SBI सर्कल परिसरात सकाळी आणि सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिक, वाहनचालक आणि विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कळंबोली शहराच्या मध्यभागी असणाऱ्या भारत पेट्रोलियमच्या पेट्रोल पंपावर CNG भरण्यासाठी येणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा रस्त्यापर्यंत येत असल्याने या कोंडीत मोठी भर पडत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

RelatedPosts

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांत दसऱ्यापूर्वी आनंदाचा शिधा देण्याची मागणी

डोणगावमध्ये कोट्यवधींचा खर्च होऊनही पाणीटंचाई; चौकशीसाठी मेहकर पंचायत समितीसमोर ९ दिवसांपासून साखळी उपोषण.

राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्कार डॉ.प्रशांत कृष्णराव पाठक यांना घोषित

या पेट्रोल पंपापासून SBI सर्कलपर्यंत CNG वाहनांच्या रांगा लागतात. त्यातच पेट्रोल पंपातून बाहेर पडणारी काही वाहने विरुद्ध दिशेने येत असल्याने वाहतुकीचा प्रश्न अधिक गंभीर बनत आहे. तसेच या ठिकाणी होणारी बेकायदा पार्किंग या मुळे सकाळी कार्यालयीन वेळेत तसेच सायंकाळी कामावरून परतणाऱ्या नागरिकांच्या गर्दीच्या वेळी या परिसरात वाहने अक्षरशः ठप्प होण्याची परिस्थिती निर्माण होते.

बँक, शाळांमुळे परिसरात मोठी वर्दळ
SBI सर्कल परिसरात बँका तसेच शाळा असल्याने या भागात दिवसभर मोठ्या प्रमाणात नागरिकांची आणि वाहनांची वर्दळ असते. अशा परिस्थितीत CNGसाठी रस्त्यावर लागणाऱ्या वाहनांच्या रांगा आणि त्यातून होणारी वाहतूक कोंडी यामुळे वाहनचालकांची मोठी गैरसोय होत आहे. वाहतूक कोंडीमुळे अपघाताचा धोकाही निर्माण होत असल्याची चिंता नागरिकांनी व्यक्त केली आहे.

पंप कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवर नागरिक नाराज
CNGसाठी वाहनांची मोठी रांग लागलेली असताना वाहतूक सुरळीत करण्यासाठी पेट्रोल पंप प्रशासनाकडून कर्मचारी नियुक्त करणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र, गर्दीच्या वेळेत पंप परिसरात वाहतूक नियोजनासाठी कोणताही कर्मचारी उपस्थित नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
याबाबत काही नागरिकांनी पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली असता, ‘हे आमचे काम नाही, हे वाहतूक पोलिसांचे काम आहे. तुम्ही वाहतूक पोलिसांकडे तक्रार करा,’ अशा प्रकारची उत्तरे दिली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या कथित उर्मट भूमिकेमुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

पेट्रोल कमी मिळत असल्याच्या तक्रारी; मशीनच्या अचूकतेवर संशय
दरम्यान, याच पेट्रोल पंपावर पेट्रोल भरताना अपेक्षेपेक्षा कमी इंधन मिळत असल्याच्या तक्रारी काही वाहनचालकांकडून करण्यात येत आहेत. पेट्रोल वितरण करणाऱ्या मशीनमध्ये काही तांत्रिक गडबड आहे का, याची तपासणी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. या तक्रारींची संबंधित विभागाने गांभीर्याने दखल घेऊन पेट्रोल पंपाच्या मशीनची तपासणी व आवश्यक असल्यास कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

तसेच पेट्रोल कमी मिळत असल्याच्या तक्रारींची निष्पक्ष चौकशी करून मशीनची तपासणी करण्यात यावी आणि दोष आढळल्यास संबंधित पेट्रोल पंपावर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे.

वाहतूक पोलिस आणि प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी
गर्दीच्या वेळेत पेट्रोल पंपाबाहेर CNG वाहनांच्या रांगा रस्त्यावर येणार नाहीत, यासाठी योग्य नियोजन करावे. तसेच पंपातून बाहेर पडणारी वाहने विरुद्ध दिशेने येणार नाहीत, यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पेट्रोल पंप प्रशासनाने वाहतूक नियोजनासाठी कर्मचारी नियुक्त करावा आणि नियमांचे उल्लंघन होत असल्यास संबंधितांवर कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात येत आहे.

कळंबोली SBI सर्कल परिसरातील हा वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना वाहतूक पोलिस, पालिका प्रशासन आणि संबंधित ‘पेट्रोल पंप व्यवस्थापनाने संयुक्तपणे पाहणी करून कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Previous Post

बॉक्सिंग स्पर्धेत शेकापूर फाटा कार्ला येथील विद्यार्थ्यांचा दणदणीत विजय

Next Post

📰 झोडगाव येथे सोयाबीन व कापूस पिकांच्या नुकसानीची पाहणी; शेतकऱ्यांची १००% नुकसानभरपाईची मागणी

Related Posts

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांत दसऱ्यापूर्वी आनंदाचा शिधा देण्याची मागणी
Blog

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांत दसऱ्यापूर्वी आनंदाचा शिधा देण्याची मागणी

October 8, 2026
1
डोणगावमध्ये कोट्यवधींचा खर्च होऊनही पाणीटंचाई; चौकशीसाठी मेहकर पंचायत समितीसमोर ९ दिवसांपासून साखळी उपोषण.
Blog

डोणगावमध्ये कोट्यवधींचा खर्च होऊनही पाणीटंचाई; चौकशीसाठी मेहकर पंचायत समितीसमोर ९ दिवसांपासून साखळी उपोषण.

October 8, 2026
2
राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्कार डॉ.प्रशांत कृष्णराव पाठक यांना घोषित
Blog

राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्कार डॉ.प्रशांत कृष्णराव पाठक यांना घोषित

October 8, 2026
5
राहुरी तालुक्यातील वांजुळपोई मांजरी रोडवर बिबट्याचा मुक्त संचार
Blog

राहुरी तालुक्यातील वांजुळपोई मांजरी रोडवर बिबट्याचा मुक्त संचार

October 8, 2026
0
Blog

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेसाठी लवकरच ऑनलाइन अर्ज

October 8, 2026
3
Blog

🔴 ब्रेकिंग – भादाणे ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक निर्णय 🔴*

October 8, 2026
1
Next Post

📰 झोडगाव येथे सोयाबीन व कापूस पिकांच्या नुकसानीची पाहणी; शेतकऱ्यांची १००% नुकसानभरपाईची मागणी

ताज्या बातम्या

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांत दसऱ्यापूर्वी आनंदाचा शिधा देण्याची मागणी

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांत दसऱ्यापूर्वी आनंदाचा शिधा देण्याची मागणी

October 8, 2026
डोणगावमध्ये कोट्यवधींचा खर्च होऊनही पाणीटंचाई; चौकशीसाठी मेहकर पंचायत समितीसमोर ९ दिवसांपासून साखळी उपोषण.

डोणगावमध्ये कोट्यवधींचा खर्च होऊनही पाणीटंचाई; चौकशीसाठी मेहकर पंचायत समितीसमोर ९ दिवसांपासून साखळी उपोषण.

October 8, 2026
राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्कार डॉ.प्रशांत कृष्णराव पाठक यांना घोषित

राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्कार डॉ.प्रशांत कृष्णराव पाठक यांना घोषित

October 8, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In