• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पोलिसांना कायदा हातात घेण्याचा अधिकार आहे का?

Pratik Tidke by Pratik Tidke
October 8, 2026
in Blog
0
0
SHARES
10
VIEWS
Ad 1

सुनील गायकवाड

RelatedPosts

📢 मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेसाठी लवकरच ऑनलाइन अर्ज

उसनवारीच्या पैस्याने विहीर उभी केली,मजुरी मात्र दोन वर्षा पासून गायब;मरेगाचा कारभार म्हणे,’तोंड दाबून बुक्क्यांचा मार…!’

महात्मा गांधी यांच्या सप्ताह निमित्ताने निरिक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग भरारी पथकाने 31कार्यवाया करून पाच लाख पाच हजार रुपयांचा दारूसाठा केला जप्त……

महिला पत्रकारावर गुन्हा दाखल; मात्र मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई कधी? वाशी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चांदेकर यांना सवाल !

नवी मुंबई प्रतिनिधी :

कायदा रक्षणाची शपथ घेणाऱ्या पोलिसांनीच कायदा हातात घेतला तर सर्वसामान्य नागरिकांनी न्याय मागायचा तरी कोणाकडे? असा संतप्त सवाल वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घटनेनंतर उपस्थित झाला आहे. महिला पत्रकार प्रिया सरोदे यांच्या कानाखाली महिला पोलीस अधिकाऱ्याने सर्वांसमक्ष मारल्याची घटना घडल्याने पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

एका महिला पत्रकारासमोरच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांसमोर पोलीस अधिकाऱ्याकडून अशा प्रकारे हात उचलला जात असेल, तर पोलिसांच्या अधिकाराला आणि जबाबदारीला मर्यादा कोण घालणार? “पोलीस आहेत म्हणून काहीही करण्याचा अधिकार मिळतो का?” असा थेट सवाल नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.

वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ‘अवंतारा स्पा’ सुरू असल्याबाबत महिला पत्रकार प्रिया सरोदे यांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज केला होता. सदर अर्जाची चौकशी करून त्यामध्ये तथ्य नसल्याचे पत्र पोलिसांकडून देण्यात आल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर प्रिया सरोदे यांनी काही सामाजिक कार्यकर्त्यांसह संबंधित स्पामध्ये जाऊन तेथे सुरू असलेल्या कथित गैरप्रकारांचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न केला.

याचदरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण-देशमुख यांनी प्रिया सरोदे यांच्या कानाखाली मारल्याची घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत असल्याने या प्रकरणाची तातडीने आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.

महिला पत्रकारावर गुन्हा दाखल; मात्र मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

या घटनेनंतर प्रिया सरोदे यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करून एफआयआर नोंदविण्यात आल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे एकीकडे महिला पत्रकारावर गुन्हा दाखल होतो, तर दुसरीकडे महिला पत्रकाराच्या कानाखाली मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध काय कारवाई करण्यात आली, हा अत्यंत गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.

एकाच घटनेकडे दोन वेगवेगळ्या मापदंडांनी पाहिले जात आहे का? असा सवालही सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. कायदा सर्वांसाठी समान असेल, तर पोलीस अधिकारी असो किंवा सामान्य नागरिक—कायद्याचे उल्लंघन झाल्यास चौकशी आणि कारवाईची प्रक्रिया समान असली पाहिजे, अशी मागणी होत आहे.

“कायद्याचे रक्षकच कायदा हातात घेणार असतील तर जनतेने विश्वास ठेवायचा कोणावर?”

पोलीस प्रशासनाकडे नागरिक संरक्षणाची जबाबदारी असताना, पोलिसांकडूनच एखाद्या महिला पत्रकाराला सार्वजनिक ठिकाणी मारहाण झाल्याचा प्रकार घडत असेल, तर हा केवळ एका पत्रकाराचा प्रश्न नसून पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरील गंभीर प्रश्न असल्याची भावना सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

समाजमाध्यमांवर प्रसारित होत असलेल्या व्हिडिओची अधिकृत तपासणी करून संपूर्ण घटनेची सत्यता निश्चित करण्यात यावी. प्रत्यक्ष मारहाण झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्यास संबंधित महिला पोलीस अधिकाऱ्यावर तातडीने शिस्तभंगाची कारवाई करून निलंबन करण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी खुलासा करावा

या संपूर्ण प्रकरणात वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चांदेकर यांची भूमिका काय होती, याचाही खुलासा पोलीस प्रशासनाने करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

महिला पत्रकारावर गुन्हा दाखल होतो; मात्र महिला पत्रकाराला मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई होत नसेल, तर ही कारवाईची समानता कुठे आहे? असा थेट सवाल उपस्थित करून संबंधित अधिकाऱ्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

निलंबनाच्या मागणीसाठी आंदोलनाचा इशारा

सामाजिक कार्यकर्ते मलिकार्जुन पुजारी यांनी संबंधित महिला पोलीस अधिकाऱ्याच्या निलंबनाची मागणी केली असून, कारवाई न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.

चौकट
मलिकार्जुन पुजारी म्हणाले :

«“प्रिया सरोदे या महिला पत्रकारास मारहाण करणाऱ्या API देशमुख-चव्हाण यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी. कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे. उद्या संध्याकाळपर्यंत संबंधित महिला पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन झाले नाही, तर हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल.”»

चौकट

आता प्रश्न एकच—कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलिसांनाही कायदा पाळावा लागणार की पोलिसांसाठी वेगळा कायदा आहे? या प्रश्नाचे उत्तर पोलीस प्रशासनाने जनतेसमोर देण्याची मागणी जोर धरत आहे.

Previous Post

अंबाजोगाईत सुरू होणार १०० प्रवेश क्षमतेचे ‘बी.एस्सी. नर्सिंग’ महाविद्यालय; आ. नमिता मुंदडा यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

Next Post

माळशिरस तालुक्यातील तरंगफळ पाटील वस्तीच्या शेतकऱ्यांना दिलासा

Related Posts

Blog

📢 मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेसाठी लवकरच ऑनलाइन अर्ज

October 8, 2026
1
Blog

उसनवारीच्या पैस्याने विहीर उभी केली,मजुरी मात्र दोन वर्षा पासून गायब;मरेगाचा कारभार म्हणे,’तोंड दाबून बुक्क्यांचा मार…!’

October 8, 2026
1
महात्मा गांधी यांच्या सप्ताह निमित्ताने निरिक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग भरारी पथकाने 31कार्यवाया करून पाच लाख पाच हजार रुपयांचा दारूसाठा केला जप्त……
Blog

महात्मा गांधी यांच्या सप्ताह निमित्ताने निरिक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग भरारी पथकाने 31कार्यवाया करून पाच लाख पाच हजार रुपयांचा दारूसाठा केला जप्त……

October 8, 2026
2
माण पंचायत समिती सभापती विक्रम शिंगाडे यांच्यावरती राजकीय सूडबुद्धीतून विनयभंगाचागुन्हा करण्यात आला आहे
Blog

माण पंचायत समिती सभापती विक्रम शिंगाडे यांच्यावरती राजकीय सूडबुद्धीतून विनयभंगाचागुन्हा करण्यात आला आहे

October 8, 2026
1
पाहून रब्बी पिकाचे नियोजन करा तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांचे शेतकऱ्यांना आव्हान
Blog

पाहून रब्बी पिकाचे नियोजन करा तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांचे शेतकऱ्यांना आव्हान

October 8, 2026
0
हर घर नळ, योजनेचा बट्ट्याबोळ
Blog

हर घर नळ, योजनेचा बट्ट्याबोळ

October 8, 2026
4
Next Post

माळशिरस तालुक्यातील तरंगफळ पाटील वस्तीच्या शेतकऱ्यांना दिलासा

ताज्या बातम्या

📢 मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेसाठी लवकरच ऑनलाइन अर्ज

October 8, 2026

उसनवारीच्या पैस्याने विहीर उभी केली,मजुरी मात्र दोन वर्षा पासून गायब;मरेगाचा कारभार म्हणे,’तोंड दाबून बुक्क्यांचा मार…!’

October 8, 2026
महात्मा गांधी यांच्या सप्ताह निमित्ताने निरिक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग भरारी पथकाने 31कार्यवाया करून पाच लाख पाच हजार रुपयांचा दारूसाठा केला जप्त……

महात्मा गांधी यांच्या सप्ताह निमित्ताने निरिक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग भरारी पथकाने 31कार्यवाया करून पाच लाख पाच हजार रुपयांचा दारूसाठा केला जप्त……

October 8, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In