कुरणखेड : शहीद क्रांतिकारक भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त वीर भगतसिंग आपत्कालीन शोध व बचाव पथकाच्या वतीने कुरणखेड येथे भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ५२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्ताची गरज असलेल्या गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
मान्यवरांच्या हस्ते भगतसिंग यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.कार्यक्रमाला मूर्तिजापूर विधानसभा आमदार हरीश पिंपळे व लोक स्वतंत्र पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सामाजिक कार्यकर्ते कमलाकर गावंडे, माजी पंचायत समिती सदस्य प्रशांत पांडे, ग्रामीण पत्रकार संघ तालुकाध्यक्ष संजय तायडे गुरुजी, संतोष चक्रनारायण, सुयोग देशमुख, अमन महल्ले, प्रेम शर्मा, विलास सावळे, रमेश समुद्रे, युनियन बँक ऑफ इंडिया कुरणखेड शाखा व्यवस्थापक आशिष खंडारे, कृषी अधिकारी अश्विन भड, सलीम बेग मिर्झा, विशाल उमाळे, वैभव उमाळे, पोलीस पाटील जामनिक, तंटामुक्ती अध्यक्ष जस्सीमुद्दीन, सामाजिक कार्यकर्ता व रुग्णसेवक योगेश लबडे, मिलिंद मोहोड, विनोद आठवले आदी उपस्थित होते.
या शिबिराचे आयोजन पत्रकार व सामाजिक कार्यकर्ता तथा वीर भगतसिंग आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख योगेश विजयकर यांच्या पुढाकारातून करण्यात आले. योगेश विजयकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. यावेळी आमदार हरीश पिंपळे यांच्या हस्ते शाल व स्वामी विवेकानंद यांचे पुस्तक देऊन योगेश विजयकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
रक्त संकलनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला रक्तपेढी व साई जीवन रक्तपेढी अकोला यांचे सहकार्य लाभले. शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने वीर भगतसिंग आपत्कालीन शोध व बचाव पथकाच्या संपूर्ण टीमचा सन्मानपत्र व ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजय माल्टे, शाहबाज शहा, सय्यद माजिद, शुभम कातखेडे, हर्षल देवरनकर, सौरभ हुतके, अजय माल्टे, मोहन वाघमारे, शेख नजीर, ईश्वर हरणे, गणेश धानोरकर, वसीमोद्दीन, निलेश नांदुरकर, प्रणित धानोरकर ,यांच्यासह पथकाच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.












