( ऑक्टोबर रोजी ‘सेवा संकल्पअभियान’ राबबिण्यात येणार आहे.याअंतर्गत कड़ेगाच तालूक्यातील कडेपूर येथील राजलक्ष्मी मंगल कार्यालयात तालुकास्तरीय ‘सेवा सेतू’शिबिराचे आायोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात महसूल विभागासह विविध शासकीय विभागांच्या सेवांचा लाभ एकाच ठिकाणी मिळणार आहे. आपले सरकार सेवा केंद्र मार्फत नागरिकांचे अर्ज जागेवरच स्वीकारून आवश्यक प्रक्रिया करण्यात येणार आहे.
प्रलंबित फेरफार नोंदीचा निपटारा,जिवंत सातबारा मोहीम,गावठाण स्वामीत्व सनद वाटप, शिधापत्रिका ,नॉन क्रिमिअर ,जात व उत्पन्न प्रमाणपत्र ,दिव्यांग प्रमाणपत्र, आधार कार्ड सेवा, जन्म -मृत्यू नोंदणी तसेच शिकाऊ वाहन चालक परवाना ,आधीसह 22 प्रमुख सेवा उपलब्ध असतील.
याशिवाय विविध शासकीय विभागांचे अर्ज व योजनांचा लाभ ही शिबिर स्थळी नागरिकांना मिळणार आहे तरी नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन कडेगाव चे तहसीलदार अजितजी शेलार साहेब यांनी केले आहे.







