• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जांबिया आश्रमशाळेच्या प्रश्नाला यश!

Pratik Tidke by Pratik Tidke
October 8, 2026
in Blog
0
जांबिया आश्रमशाळेच्या प्रश्नाला यश!
0
SHARES
89
VIEWS
Ad 1
Ad 1

महिनाअखेरपर्यंत शिक्षक भरतीचे ATC नागपूर यांचे आश्वासन; वसतिगृहातील पाणी व पंख्यांची समस्याही सुटणार

RelatedPosts

केलेले दान आणि भजन नेहमी गुप्त असावे – प. पू. मीरा अलकाश्रीजी

दुष्काळाच्या छायेतही संस्कृती जपली; येळपणे येथे सांगळे बंधूंनी घातले गायीचे अनोखे डोहाळे जेवण

कांदिवलीत धनगर समाजाच्या वधू-वर मेळाव्याच्या नियोजनासाठी चर्चा बैठक

तालुका प्रतिनिधी : सुगत उराडे
जांबिया, ता. एटापल्ली
दि. ८ ऑक्टोबर २०२६

एटापल्ली : शासकीय माध्यमिक आश्रमशाळा जांबिया येथे इयत्ता १ ली ते १२ वीपर्यंत वर्ग सुरू असताना केवळ पाच कायमस्वरूपी शिक्षक कार्यरत असल्याचा गंभीर प्रश्न आठ गावांच्या पारंपरिक ग्रामसभेने प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला होता. या प्रश्नावर ग्रामसभेने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर अखेर प्रशासनाकडून सकारात्मक आश्वासन मिळाले आहे.

दि. ७ ऑक्टोबर रोजी ग्रामसभेच्या प्रतिनिधींनी आश्रमशाळेची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी शाळेतील शिक्षकांची कमतरता तसेच वसतिगृहातील पिण्याचे पाणी व पंख्यांची समस्या निदर्शनास आली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी संबंधित या गंभीर प्रश्नांवर तातडीने उपाययोजना न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा ग्रामसभेने दिला होता.

या पार्श्वभूमीवर दि. ८ ऑक्टोबर रोजी आदिवासी आयुक्तालय, नागपूर येथील ATC मॅडम यांनी ग्रामसभा प्रतिनिधींशी चर्चा करून महत्त्वपूर्ण आश्वासन दिले.

महिनाअखेरपर्यंत शिक्षकांची नियुक्ती

ATC मॅडम यांच्या आश्वासनानुसार जांबिया आश्रमशाळेत—

  • इयत्ता १ ली ते ७ वी : ७ शिक्षक
  • इयत्ता ८ वी ते १० वी : ३ शिक्षक
  • इयत्ता ११ वी ते १२ वी : २ शिक्षक
  • अधीक्षक व अधीक्षिका

यांची या महिन्याच्या अखेरपर्यंत नियुक्ती करण्यात येणार आहे. तसेच वसतिगृहातील पंख्यांची समस्या आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सोडविण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले.

आठ गावांच्या एकजुटीचा पहिला विजय

आश्रमशाळेतील शिक्षकांची कमतरता आणि विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आठ गावांच्या पारंपरिक ग्रामसभेने एकजुटीने आवाज उठविला. ग्रामसभेच्या पाठपुराव्याला मिळालेले हे यश म्हणजे आठ गावांच्या एकजुटीचा पहिला विजय असल्याची भावना ग्रामसभा प्रतिनिधींनी व्यक्त केली.

प्रशासनाने प्रश्नाची दखल घेत सकारात्मक आश्वासन दिल्याबद्दल आठ गावांच्या संयुक्त पारंपरिक ग्रामसभेने प्रशासनाचे आभार मानले आहेत.

— ८ गावांची संयुक्त पारंपरिक ग्रामसभा, जांबिया पंचायत क्षेत्र

Ad 1
Previous Post

पी.व्ही.पी. मध्ये अभिजात मराठी ग्रंथ प्रदर्शन व विशेष व्याखान

Next Post

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन

Related Posts

केलेले दान आणि भजन नेहमी गुप्त असावे – प. पू. मीरा अलकाश्रीजी
Blog

केलेले दान आणि भजन नेहमी गुप्त असावे – प. पू. मीरा अलकाश्रीजी

November 22, 2026
8
दुष्काळाच्या छायेतही संस्कृती जपली; येळपणे येथे सांगळे बंधूंनी घातले गायीचे अनोखे डोहाळे जेवण
Blog

दुष्काळाच्या छायेतही संस्कृती जपली; येळपणे येथे सांगळे बंधूंनी घातले गायीचे अनोखे डोहाळे जेवण

November 22, 2026
26
कांदिवलीत धनगर समाजाच्या वधू-वर मेळाव्याच्या नियोजनासाठी चर्चा बैठक
Blog

कांदिवलीत धनगर समाजाच्या वधू-वर मेळाव्याच्या नियोजनासाठी चर्चा बैठक

November 22, 2026
32
औद्योगिक प्रदर्शनाच्या शैक्षणिक भेटीतून विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती
Blog

औद्योगिक प्रदर्शनाच्या शैक्षणिक भेटीतून विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती

November 21, 2026
18
मेहकर नगरपालिकेची अतिक्रमण हटाव कारवाई; विकासकामांना नागरिकांचा पाठिंबा, नुकसानभरपाईची मागणी
Blog

मेहकर नगरपालिकेची अतिक्रमण हटाव कारवाई; विकासकामांना नागरिकांचा पाठिंबा, नुकसानभरपाईची मागणी

November 21, 2026
7
दीपनगर येथील साने गुरुजी वाचनालयात इंदिरा गांधी जयंती साजरी
Blog

दीपनगर येथील साने गुरुजी वाचनालयात इंदिरा गांधी जयंती साजरी

November 20, 2026
12
Next Post
ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन

ताज्या बातम्या

जांभारीत वीजेचा खांब कोसळला; सुदैवाने जीवितहानी टळली

जांभारीत वीजेचा खांब कोसळला; सुदैवाने जीवितहानी टळली

November 23, 2026
केलेले दान आणि भजन नेहमी गुप्त असावे – प. पू. मीरा अलकाश्रीजी

केलेले दान आणि भजन नेहमी गुप्त असावे – प. पू. मीरा अलकाश्रीजी

November 22, 2026
आलेगाव येथे धम्मप्रवचनातून सदाचाराचा संदेश; कु. अन्वीचा वाढदिवस धम्ममय वातावरणात साजरा

आलेगाव येथे धम्मप्रवचनातून सदाचाराचा संदेश; कु. अन्वीचा वाढदिवस धम्ममय वातावरणात साजरा

November 22, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In