कवठे महांकाळ, प्रतिनिधी विलास उत्तम लोखंडे
मोबाईल आणि इंटरनेटचा वाढता वापर जसा सोयीचा ठरत आहे, तसाच सायबर फसवणुकीचा धोकाही वाढत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करून होणाऱ्या ऑनलाइन फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर कवठे महांकाळ पोलिसांनी सायबर सुरक्षेबाबत जनजागृतीचा उपक्रम गुरुवारी दिनांक ८ ऑक्टोबर रोजी राबविला.
‘इंडियन सायबर क्राईम को-ऑर्डिनेशन सेंटर’ आणि ‘महाराष्ट्र सांगली पोलीस दलातर्फे ऑक्टोबर २०२६ हा ‘सायबर जनजागृती महिना’ म्हणून राबविण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक कल्पना सायबर’ यांच्या मार्गदर्शनाखाली बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभर विविध जनजागृती उपक्रम सुरू आहेत. याच अभियानांतर्गतपोलीस निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे यांच्या नेतृत्वाखाली कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सायबर जनजागृती कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी संशयास्पद फोन, बनावट लिंक, ओटीपी मागणारे संदेश, बँक खात्याची माहिती मिळविण्याचे प्रयत्न, शासकीय अधिकारी असल्याचे भासवून
होणारी फसवणूक तसेच विविध आमिषांच्या माध्यमातून होणाऱ्या ऑनलाइन आर्थिक फसवणुकीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका, ओटीपी किंवा बैंकिंग माहिती कोणालाही देऊ नका आणि संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका, असा महत्त्वाचा संदेश पोलिसांनी दिला. डिजिटल व्यवहारात सावधगिरी
आणि जागरूकता हीच सायबर गुन्ह्यांपासून बचावाची पहिली पायरी असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. यावेळी कवठे महांकाळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर, सुशांत माळी, राकेश पाटील, ठाण्याचे इतर पोलीस अधिकारी, पोलिस कर्मचारी तसेच तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.










