पेण : पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळा, पेण येथील १७ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला.
दि. ६ ऑक्टोबर २०२६ रोजी संपन्न झालेल्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेतील १७ वर्षे वयोगटाच्या अंतिम सामन्यात शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत उपविजेतेपद मिळविले. विद्यार्थ्यांनी दाखविलेली जिद्द, संघभावना, शिस्त आणि उत्कृष्ट खेळामुळे शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेच्या वतीने सर्व विजयी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले. तसेच त्यांच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.











