वडकी पोलिसांची धडक कारवाई 2 लाख 11 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त
तालुका प्रतिनिधी / अनिकेत बदखल
वडकी पोलीस स्टेशन हद्दीतील ग्राम दहेगाव शिवारात अवैधपणे गांजा वनस्पतीची लागवड केल्याप्रकरणी वडकी पोलिसांनी छापा मारून गांजाची झाडे जप्त केली आहेत. या कारवाईत तब्बल 10.580 किलोग्रॅम वजनाचा गांजा, ज्याची अंदाजे किंमत 2,11,600 रुपये आहे, तो जप्त करण्यात आला आहे.
घटनाक्रमाची सविस्तर माहिती:
मा. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंता यांनी जिल्ह्यातील सर्व ठाणेदार यांची मिटिंग घेऊन गांजा, ड्रग्स अमली पदार्थाचे समूळ उच्चाटन करण्याचे उद्देशाने सर्व ठाणेदार यांनी आपला मोबाईल क्रमांक वृत्तपत्रात जाहिरात देऊन आणि प्रेस कॉन्फरन्स द्वारे लोकांना द्यावा असे आदेशावरून दि. 06/10/2026 रोजी पोलीस स्टेशन वडकी येथील ठाणेदार श्री. सुखदेव भोरकडे यांनी वृत्तपत्र त्यांचा मोबाईल क्रमांक प्रकाशित केला होता त्यावरून त्यांना गोपनीय बातमीदाराकडून पक्की माहिती मिळाली की, ग्राम दहेगाव ता. राळेगाव येथील रहिवासी वंंजु मोतीराम काळे (वय 40 वर्षे) याने आपल्या वहिवाटीतील ई-क्लास जमिनीवरील श











