अहिल्यानगर : बलात्काराच्या गुन्ह्यात २०१७ पासून फरार असलेल्या आरोपीला अहिल्यानगर येथील कोतवाली पोलिसांनी श्रीगोंदा येथून अटक केली. रिपुस ऊर्फ इपुस मेहरा भोसले (रा. लोणी व्यंकनाथ, ता. श्रीगोंदा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या वृत्तानुसार, संबंधित आरोपी हा २०१७ मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यात फरार होता. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू होते. अखेर आरोपी श्रीगोंदा येथील शनी चौक परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर कोतवाली पोलिसांनी कारवाई करत त्याला ताब्यात घेतले.
दीर्घकाळापासून फरार असलेल्या आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणातील पुढील कायदेशीर प्रक्रिया पोलिसांकडून करण्यात येत आहे.








