‘सेवा संकल्प अभियानातून’ ५ हजार रोपांची लागवड; पर्यावरण संवर्धनासाठी सामाजिक दायित्वाचा पुढाकार
आळंदी/प्रतिनिधी
पर्यावरण संवर्धन आणि हरित आळंदीच्या निर्मितीसाठी आळंदी येथील ‘सिद्धबेट’ परिसरात ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत जपानी “मियावाकी” पद्धतीने ५ हजार रोपांचे वृक्षारोपण दिनांक (८),वार (गुरु) ऑक्टो,२०२६ या रोजी नुकतेच करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर देशभरात सर्वत्र सेवा संकल्प अभियान राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने सामाजिक सेवा हितकारी उपक्रम राबविण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली आहे. त्यानुसारच महाराष्ट्रातील आळंदी मध्ये देखील महाराष्ट्र शासनाच्या “स्वच्छता हीच सेवा” – २०२६ या अभियानाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक दायित्वाच्या माध्यमातून हा पर्यावरण पूरक उपक्रम राबविण्यात आला.
हरित ,सुंदर आणि पर्यावरण पूरक निर्मिती व शाश्वत विकासाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल !
पर्यावरणाचे संरक्षण, संवर्धन, वृक्षसंपदेची वाढ, जैवविविधतेचे संवर्धन या उद्देशाने राबविण्यात आलेला हा सामाजिक, विकासात्मक उपक्रम ग्रामीण व शहरी या दोन्ही पर्यावरणीय विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. हरित क्षेत्र वाढविणे, पर्यावरणाचा समतोल राखणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.”वोडाफोन आयडिया फाउंडेशन” आणि “इंडेव् कन्सल्टन्सी” चा सहभाग
या उपक्रमाची संकल्पना व अंमलबजावणी “वोडाफोन आयडिया फाउंडेशन” यांनी केली . तसेच “इंडेव कन्सल्टन्सी “यांनी अंमलबजावणी भागीदार म्हणून काम पाहिले.हा उपक्रम “वोडाफोन इंटेलिजंट सोल्युशन्स“ यांच्या कार्पोरेट सामाजिक दायित्वाच्या (CSR ) माध्यमातून राबविण्यात आला .
या उपक्रमातून, सामाजिक दायित्वातून या वृक्षारोपणास उपस्थितांना पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला.पर्यावरण संवर्धनाला बळ मिळाले .
वाढते शहरीकरण ,अशुद्ध हवा, हवेचे प्रदूषण आणि घटणारी वृक्षसंपदा या पार्श्वभूमीवर शहरी व ग्रामीण मध्ये मोठ्या प्रमाणावर हरित क्षेत्र वाढविणे ही काळाची गरज बनली आहे. त्यादृष्टीने सिद्धबेट परिसरात करण्यात आलेली ५ हजार रोपांची लागवड पर्यावरण संवर्धनाच्या प्रयत्नांना चालना देणारी ठरू शकते.
“मियावाकी“ पद्धतीतून घनदाट वननिर्मिती क्षेत्र वाढविणे
“मियावाकी” ही कमी जागेत विविध स्थानिक वृक्ष प्रजातींची घनदाट लागवड करून वनक्षेत्र विकसित करण्याची पद्धत आहे. या रोपांच्या लागवडीमुळे हरित क्षेत्र वाढविण्यास आणि स्थानिक जैवविविधतेला प्रोत्साहन देण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे. योग्य प्रजातीची निवड ,मातीची गुणवत्ता, पाण्याचे नियोजन आणि नियमित देखभाल यांच्या आधारे या वनक्षेत्राचा विकास होतो. ‘सिद्धबेट’ परिसरातील या उपक्रमामुळे हरितक्षेत्र वाढविण्या सोबतच स्थानिक जैवविविधतेला पोषक वातावरण निर्माण होण्याची अपेक्षा आहे. मात्र यासाठी रोपांचे योग्य संगोपन, संवर्धन व संरक्षण करणे महत्त्वपूर्ण ठरते.या वृक्षरोपणाच्या माध्यमातून हरितक्षेत्र निर्मितीला प्रोत्साहन मिळण्याबरोबरच पर्यावरणाबाबत जनजागृती होण्यासही मदत होणार आहे. पर्यावरण संवर्धनासाठी सामूहिक पुढाकार आवश्यक आहे .आजच्या काळात वृक्षारोपण ही केवळ औपचारिकता न राहता पर्यावरण रक्षणाची लोक चळवळ बनणे ही काळाची गरज आहे. “सेवा संकल्प अभियान“ अंतर्गत हाती घेण्यात आलेला ५ हजार रोपांच्या वृक्षारोपणाचा हा उपक्रम आळंदीच्या पर्यावरण संवर्धनासाठी सकारात्मक पाऊल आहे. नागरिकांनी या कार्यातून प्रेरणा घेऊन वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धनाच्या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा,असे आवाहन या उपक्रमाच्या निमित्ताने करण्यात आले. आळंदी नगर परिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले.
“स्वच्छ आणि हरित“ परिसर निर्माण करण्यासाठी नागरिकांनीही पुढाकार घेणे आवश्यक असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. या सामाजिक दायित्व उपक्रमासाठी निधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हितेश वधवानी यांनी पुढाकार घेत समन्वयाची भूमिका पार पाडली. पर्यावरण संवर्धन ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. नागरिकांच्या सहभागातूनच वृक्षारोपणाची मोहीम यशस्वी होऊ शकते. सिद्धबेट हे निसर्गातील इतर लहान जीवांसाठी एक उत्तम नैसर्गिक अधिवास क्षेत्र निर्माण होणार आहे. केवळ ‘वृक्षारोपण’ नाही ‘संगोपना’चाही संकल्प. या मोहिमेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे केवळ झाडे लावून हा उपक्रम थांबणार नाही, तर या रोपांच्या पुढील तीन वर्षांच्या संगोपनाची, त्यांना नियमित पाणी देण्याची आणि सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी सीएसआर (CSR) भागीदार आणि आयोजक संस्थांनी घेतली आहे.
“झाडे लावणे ही केवळ पर्यावरणाची गरज नसून आपल्या पुढच्या पिढीच्या आरोग्यासाठी केलेली एक सुरक्षित गुंतवणूक आहे. सिद्धबेटाचा हा परिसर लवकरच आळंदीकरांसाठी आणि येथे येणाऱ्या भाविकांसाठी शुद्ध ऑक्सिजनचा मुख्य स्रोत बनेल,” असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. प्रशासनाच्या वतीने सर्व नागरिकांना आणि भाविकांना या हरित क्षेत्राचे जतन पर्यावरण, संवर्धन, संरक्षणाच्या या कार्यात आपले योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भविष्यात होणारे मुख्य फायदे :
१) हवेच्या गुणवत्तेत सुधारणा : ५ हजार झाडांमुळे हवेतील प्रदूषण आणि कार्बनचे प्रमाण वेगाने कमी होईल.
२) तापमानावर नियंत्रण : सिमेंटचे जंगल बनत चाललेला शहरी भागात हे ‘मीयावकी’ वन तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत करेल.
३) जैवविविधता : पक्षी , मधमाशा आणि फुलपाखरांसाठी सिद्धबेटमध्ये एक नवे सुरक्षित घर तयार होईल.
हरित आळंदीसाठी सामूहिक प्रयत्नांची गरज
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पवित्र आळंदी नगरीत पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने अशा उपक्रमांना विशेष महत्त्व आहे. विविध सामाजिक ,शैक्षणकसंस्था,संघटना, प्रशासन, उद्योग समूह आणि नागरिक यांनी एकत्रितपणे पुढाकार घेतल्यास शहर व ग्रामीण भागातील हरितक्षेत्र वाढविण्यास मदत होईल.
हरित, सुंदर व प्रदूषणमुक्त आळंदी हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी वृक्षारोपणासोबत वृक्षसंवर्धनाची चळवळ अधिक व्यापक होणे ही काळाची गरज आहे. प्रत्येक नागरिकाने वृक्षारोपणा सोबत वृक्ष संवर्धनाचा संकल्प करण्याची गरज आहे.
वृक्ष लावा ,वृक्ष वाढवा ,वृक्ष जगवा आणि हरित आळंदी घडवा, हा संदेश अधोरेखित होत आहे.
या उपक्रमात सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी ,वन कर्मचारी ,स्थानिक प्रशासन ,विविध मान्यवर तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी, स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.







