• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सोनसरी आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या आत्महत्येप्रकरणी चौकशी व कारवाईचे आदेश

Pratik Tidke by Pratik Tidke
October 14, 2026
in Blog
0
0
SHARES
3
VIEWS
Ad 1
Ad 1

अधीक्षिकेच्या निलंबनाचे मंत्री डॉ. अशोक उईके यांचे निर्देश; कुटुंबीयांना दोन लाख रुपयांचे अनुग्रह अनुदान

RelatedPosts

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

गडचिरोली, (जिमाका) : कुरखेडा तालुक्यातील सोनसरी येथील शासकीय आश्रमशाळेत इयत्ता आठवीत शिक्षण घेणाऱ्या १४ वर्षीय विद्यार्थिनीच्या आत्महत्येच्या घटनेची आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचे तसेच संबंधित अधीक्षिकेला तात्काळ निलंबित करून तिच्यावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना अनुग्रह अनुदान म्हणून दोन लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर डॉ. उईके यांनी कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी कुटुंबीयांशी संवाद साधला आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून घटनेची माहिती घेतली. या प्रकरणात कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

यानंतर पत्रकारांशी बोलताना डॉ. उईके यांनी आश्रमशाळा प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. घटनेच्या अनुषंगाने संबंधितांची जबाबदारी तपासून आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

गडचिरोली प्रकल्पांतर्गत येणाऱ्या सर्व शासकीय आश्रमशाळांचा नियमित आढावा घेण्याच्या सूचनाही डॉ. उईके यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांना दिल्या. आश्रमशाळांतील मुख्याध्यापक आणि अधीक्षक-अधीक्षिकांशी नियमित संवाद व संपर्क ठेवून शाळा आणि वसतिगृहांतील परिस्थितीची माहिती घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

यापुढे आश्रमशाळांमध्ये अशा प्रकारची घटना घडल्यास संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यांच्या भूमिकेचीही चौकशी करून कारवाई करण्यात येईल, असा इशारा डॉ. उईके यांनी दिला.

यावेळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अरुण एम. , माजी आमदार कृष्णाजी गजबे, माजी आमदार नामदेवराव उसेंडी, चांगदेव फाये व संबंधित शासकीय अधिकारी उपस्थित होते.

Ad 1
Previous Post

भुदरगड तालुक्यातील पर्यटन स्थळे बनली मृत्यूचे सापळे! नाईकवाडी घटनेनंतर सुरक्षा प्रश्न ऐरणीवर; प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात जनतेत तीव्र संताप

Next Post

चार शक्तिस्वरूपांचे एकत्रित स्थान; निवडुंग्यात नवरात्रोत्सवाला सुरुवात

Related Posts

Blog

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
6
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान
Blog

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026
3
Blog

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026
5
माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.
Blog

माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.

October 14, 2026
3
चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन
Blog

चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

October 14, 2026
19
२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.
Blog

२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.

October 14, 2026
3
Next Post
चार शक्तिस्वरूपांचे एकत्रित स्थान; निवडुंग्यात नवरात्रोत्सवाला सुरुवात

चार शक्तिस्वरूपांचे एकत्रित स्थान; निवडुंग्यात नवरात्रोत्सवाला सुरुवात

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In