• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.

Pratik Tidke by Pratik Tidke
October 14, 2026
in Blog
0
माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.
0
SHARES
2
VIEWS
Ad 1
Ad 1

ह.भ.प. लक्ष्मणदाजी काळे महाराज यांचे कीर्तनमाढेळी
येथील अग्रगण्य वित्तीय संस्था प्रियदर्शनी बिगर शेतकी सहकारी पतसंस्था मर्यादित, माढेळी हिच्या स्थापनेला यशस्वी २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आयोजित रौप्य महोत्सव आणि आदर्श दुर्गा उत्सव मंडळ, माढेळी यांच्या संयुक्त विद्यमाने आज, दिनांक १३ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ठीक ८:०० वाजता सुभाष चौक, माढेळी येथे भव्य कीर्तन सोहळा व सांस्कृतिक कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाला माढेळी व परिसरातील हजारो भाविकांनी अभूतपूर्व गर्दी केली होती.
या मंगल प्रसंगी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध प्रबोधनकार आणि कीर्तनकार ह.भ.प. लक्ष्मणदाजी काळे महाराज यांचे जाहीर कीर्तन संपन्न झाले. त्यांनी आपल्या रसाळ, सुश्राव्य आणि प्रबोधनात्मक वाणीतून ज्ञानामृताची वर्षाव करत उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले. आध्यात्मिक प्रबोधनासोबतच त्यांनी व्यसनमुक्ती सामाजिक ऐक्यावर आपल्या कीर्तनातून विशेष भर दिला.

RelatedPosts

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

या ऐतिहासिक सोहळ्याचे मुख्य आकर्षण प्रियदर्शनी बिगर शेतकी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष श्री. प्रकाशजी मुथा यांची प्रमुख उपस्थिती हे होते. त्यांच्या हस्ते व उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते माता दुर्गेची महाआरती व पूजन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना अध्यक्ष प्रकाशजी मुथा यांनी प्रियदर्शनी पतसंस्थेच्या २५ वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला आणि सभासद, ठेवीदार व ग्रामस्थांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच त्यांनी आदर्श दुर्गा उत्सव मंडळाच्या सामाजिक व सांस्कृतिक कार्याचा गौरव करत सर्व ग्रामस्थांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
‘जय माता दी’ च्या जयघोषाने संपूर्ण सुभाष चौक परिसर दुमदुमून गेला होता. या संयुक्त सोहळ्यामुळे माढेळीत एक वेगळाच भक्तीचा आणि उत्साहाचा पूर आला होता.
हा भव्य सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रियदर्शनी पतसंस्थेचे सर्व संचालक मंडळ, अधिकारी, सेवक वर्ग, तसेच आदर्श दुर्गा उत्सव मंडळाचे पदाधिकारी, सदस्य आणि माढेळी येथील युवा कार्यकर्त्यांनी अतोनात परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला महिला, बालके आणि ज्येष्ठ नागरिकांची रेकॉर्डतोड उपस्थिती लाभली होती.

Ad 1
Previous Post

चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

Next Post

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

Related Posts

Blog

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
1
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान
Blog

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026
1
Blog

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026
4
चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन
Blog

चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

October 14, 2026
13
२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.
Blog

२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.

October 14, 2026
3
नवी मुंबई पालिका बालवाडी शिक्षिका आणि मदतनिसांच्या मानधनात वाढ करण्याची श्रमिक सेनेची मागणी
Blog

नवी मुंबई पालिका बालवाडी शिक्षिका आणि मदतनिसांच्या मानधनात वाढ करण्याची श्रमिक सेनेची मागणी

October 14, 2026
17
Next Post

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In