• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

Pratik Tidke by Pratik Tidke
October 14, 2026
in Blog
0
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान
0
SHARES
1
VIEWS
Ad 1
Ad 1

धामोरी कोपरगाव तालुका प्रतिनिधी.. अथर्व वाणी

RelatedPosts

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.

कोपरगाव तालुक्यातील धामोरी गावचे भूमिपुत्र तथा सुप्रसिद्ध अँकर आणि उत्कृष्ट सूत्रसंचालक प्रदीप आहिरे यांच्या कलाक्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत त्यांना यंदाचा लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान करण्यात आला. उत्कृष्ट सूत्रसंचालनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल स्वरनाद संगीत विद्यालय, रुई (ता. राहाता) आणि कलाविष्कार यांच्या वतीने हा मानाचा पुरस्कार त्यांना देण्यात आला.

विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक तसेच कला क्षेत्रातील कार्यक्रमांना आपल्या प्रभावी आवाजाने, ओघवत्या निवेदनशैलीने आणि उत्स्फूर्त सूत्रसंचालनाने रंगत आणण्याचे काम प्रदीप आहिरे सातत्याने करत आहेत. कार्यक्रमाचे स्वरूप आणि प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन उपस्थितांशी प्रभावी संवाद साधण्याची त्यांची शैली विशेष उल्लेखनीय मानली जाते. आपल्या सूत्रसंचालनातून त्यांनी रसिकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली आहे..

या पुरस्कार सोहळ्याप्रसंगी सुप्रसिद्ध शाहीर सुनीलदादा खरे, कवी-साहित्यिक शरदजी शेजवळ सर, सामाजिक कार्यकर्ते गागरे दादा तसेच स्वरनाद संगीत विद्यालयाच्या संस्थापिका आरती ताई खरात यांच्या शुभहस्ते प्रदीप आहिरे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी त्यांच्या सूत्रसंचालनातील योगदानाचे कौतुक करत भविष्यातही कला व सांस्कृतिक क्षेत्रात अशीच उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

लोककवी वामनदादा कर्डक यांच्या नावाने मिळालेला हा पुरस्कार प्रदीप आहिरे यांच्या कलाविषयक कार्याला मिळालेली विशेष पावती असून, हा सन्मान त्यांच्या कुटुंबीयांसह धामोरी गावासाठीही अभिमानाची बाब ठरली आहे. गावातील भूमिपुत्राने आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर मिळविलेल्या या सन्मानामुळे धामोरीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

प्रदीप आहिरे यांना हा पुरस्कार मिळाल्याचे वृत्त समोर येताच मित्रपरिवार, नातेवाईक, ग्रामस्थ, कला क्षेत्रातील सहकारी तसेच विविध सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून कौतुक व्यक्त करण्यात येत असून, त्यांच्या पुढील कलाविषयक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Ad 1
Previous Post

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

Next Post

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

Related Posts

Blog

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
4
Blog

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026
5
माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.
Blog

माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.

October 14, 2026
3
चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन
Blog

चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

October 14, 2026
17
२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.
Blog

२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.

October 14, 2026
3
नवी मुंबई पालिका बालवाडी शिक्षिका आणि मदतनिसांच्या मानधनात वाढ करण्याची श्रमिक सेनेची मागणी
Blog

नवी मुंबई पालिका बालवाडी शिक्षिका आणि मदतनिसांच्या मानधनात वाढ करण्याची श्रमिक सेनेची मागणी

October 14, 2026
17
Next Post

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In