माजी सभापती डॉ. संजय सांगळे यांच्या हस्ते विधिवत पूजन; महिला मंडळासह मान्यवरांची उपस्थिती
मनमाड | प्रतिनिधी
मनमाड शहरातील शिवनेरी नगर येथे शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त सप्तशृंगी देवीची स्थापना करण्यात आली. यावेळी माजी सभापती डॉ. संजय सांगळे यांच्या हस्ते देवीचे विधिवत पूजन करण्यात आले. धार्मिक वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले.
या कार्यक्रमाला समाजसेवक आकाश जैस्वाल, एकनाथ बोडखे, राजू पटेल यांच्यासह महिला मंडळाच्या सदस्यांची उपस्थिती होती. उपस्थितांनी देवीचे दर्शन घेऊन पूजन केले.
नवरात्रोत्सवानिमित्त शिवनेरी नगर परिसरात उत्साहाचे वातावरण असून, देवीच्या स्थापनेमुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. स्थानिक नागरिक आणि महिला मंडळाच्या सहभागातून हा धार्मिक सोहळा पार पडला.
वार्ताहर : मनमाड प्रतिनिधी






