धर्माबाद- आगामी विधानसभा निवडणूक २०२४ साठी भारतीय जनता पक्षाने नायगाव विधानसभा मतदारसंघातून विकास कामासाठी विक्रमी निधी खेचून आणत जातीपातीच्या पलीकडचे राजकारण करीत कुठलाही भेदभाव न करता सर्वांचाच विकास साधणारे आमदार राजेश पवार यांच्या निकष पूर्ण कार्यप्रणालीवर भारतीय जनता पक्षाने मोठा विश्वास दाखवत पुन्हा तिकीट दिल्यामुळे धर्माबाद शहरात काल सायंकाळी एकच जल्लोष साजरा करण्यात आला.
पक्षांतर्गत गटबाजीसह विरोधी पक्षाने आमदार राजेश पवार यांना अक्षरशः एकटे पाडण्याचा प्रयत्न केला होता. त्यांची ओटबँक फोडण्याचाही अलीकडच्या काळात प्रयत्न करण्यात येऊन जातीपातीच्या राजकारणाला विघ्नसंतोषी लोकांकडून खतपाणी घालण्यात आले होते. पण आपल्या विकास कामाच्या जोरावर व देव देश व धर्म ही संकल्पना यशस्वी राबवत आपल्या नायगाव विधानसभा मतदारसंघातील तीनही तालुक्याचा साठ वर्षाच्या कार्यकाळातला सर्वोच्च विकास साधत विकृत कार्यकर्त्याची फळी उद्ध्वस्त करीत थेट जनतेत मिसळून जनतेच्या हातात आपल्या भविष्याचा निर्णय देणारे आमदार राजेश पवार यांच्याबाबत परवा पर्यंत त्यांचे तिकीट कापल्या जाईल, त्यांचं राजकारण संपुष्टात आले अशा वल्गना करणाऱ्यांना एक सणसणीत चपराक पक्षाने दिली आहे.
धर्माबाद येथील हुतात्मा पानसरे चौकात फटाक्याची आतिषबाजी व गगनभेदी घोषणाबाजी करत भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.
यावेळी झारखंडचे आमदार तथा नायगाव विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रभारी विजय नायडू, नायगाव विधानसभा अध्यक्ष विठ्ठल पाटील चोळखेकर, भाजपाचे तालुका अध्यक्ष विजय डांगे, शहराध्यक्ष रमेश अण्णा गौड, धर्माबाद शिक्षण संस्थेचे सचिव डॉ.कमल किशोर काकांनी, भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष सतीश भाऊ मोटकुल ,रामेश्वर गंदलवार, यलप्पा अक्कालवार, शंकर अण्णा तुनकेवाड, तुकाराम पाटील महागवळी, यादव डाकोरे, अजीज पिंजारी, प्रविण मदनुरे, गंगाप्रसाद गोस्कुलवाड, व्यंकटेश, मनीष पाटील, योगेश, अर्जून यंगनटीवार, मुरली गौड, माजी उपनगराध्यक्ष विजय राठौर, प्रसिद्ध युवा वकील चक्रेश पाटील, श्रीनिवास पाटील भुतावळे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
Discussion about this post