



दि – २८/१०/२०२४ प्रतिनिधी :- रमेश बनसोडे. पुणे.ग्रामीण दौंड तालुक्यात पुणे सोलापूर महामार्गावरील वरंवड गावाजवळील कौठीचा मळा येथे आज दुपारी 12 च्या सुमारास घटना घडली आहे.
आज मिळालेल्या माहितीनुसार वरवंड गावाच्या हद्दीतील कौठीचा मळा
जवळ दोन बसेसचा समोरासमोर भीषण टक्कर झाली
सोलापूरच्या दिशेने जात असलेल्या बसला एका दुचाकीस्वार आडवा आला.त्या आडव्या येणाऱ्या दुचाकीस्वारास वाचवण्यासाठी बस ने दुभागाच्या दिशेने गाडी वळवली.अगदी त्याचवेळी दुसऱ्या बाजूने येणाऱ्या बसला जोरदार धडक बसली.
समोरासमोर धडक बसल्याने बसमधील 25 ते 30 प्रवासी जखमी झाले आहे तर
तीन. प्रवासी सिरियस आहे.व अनेक प्रवासी यांचे हात पाय मोडले गेले आहे अशी माहिती मिळत आहे.या अपघाताची वार्ता कळताच दौंडचे आमदार राहुल कुल घटनास्थळी पोहचले.आमदार राहुल कुल यांनी पोलिसांची भेट देत मदत कार्य सुरू केले.
आमदार राहुल कुल यांनी प्रशासकीय यंत्रणेला सूचना देऊन योग्य त्या रोग्नालयात दाखल करून त्वरित उपचार करावे.
ही टक्कर एवढी भीषण होती की दोन्ही बसचा चक्राचुर झाला आहे.ह्या सर्व घडलेला अपघाताचा तपास पोलीस यंत्रणा करीत आहे.
Discussion about this post