
मानोरा प्रतिनिधी /विशाल मोरे
मानोरा: मानोरा येथे वाशिम जिल्ह्यातील सर्व आदिवासी समाज बांधवांच्या चिंतन मंथन व राजकीय घडामोडीच्या बैठकीचे आयोजन २८ ऑक्टोंबर २०२४ रोजी सजय गोदमले यांच्या निवासस्थानी करण्यात आले होते.
सदर बैठक कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. महादेव वाघमारे ( माजी मंडळधिकारी ) हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून चिंतामणजी खुळे माजी जी.प. सदस्य, मारुतीभाऊ पारधी, संजय गोदमले, योगेश पारधी, बाबूलाल वानखडे, सुदाम भोंडणे, अविनाश झळके, निखिल अंभोरे, आनंद खुळे, नरहरी ढंगारे, हे होते.
नंतर सदर बैठकीला उपस्थित असलेल्या समाज बांधवांना मार्गदर्शन प्रा.बंडूभाऊ वाघमारे, ॲड. मुंगसिराम गिराटकर, सुधिर झळके, सुदामराव भोंडणे, मारोतीभाऊ पारधी, गजानन गिर्हे, निरंजन नाटकर, गजानन डोलारकर, शेवटी अध्यक्षिय मार्गदर्शन महादेव वाघमारे, यांनी केले आहे.
नंतर सर्वांनी आपआपले मत व्यक्त करून समाजाच्या व्यथा , अडीअडचणी, यावर चर्चा करून विशेषता जिल्ह्यातील सर्व आदिवासी समाजांनी जसा लोकसभेमध्ये मतदानाचा निर्णय घेतला होता तसाच एकजुटीचा निर्णय सद्या विधानसभे मध्येही घेण्यात येईल व असाच निर्णय यापुढेही घेण्यात येईल असे सर्वांनुमते घेण्यात आला आहे.
या बैठकीला वाशिम, मंगरूळ, कारंजा, मानोरा व जिल्ह्यातील सामाजिक व राजकिय अभ्यासक आदिवासी समाजातील मंडळी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आनंद खुळे यांनी केले तर आभार निखिल अंभोरे यांनी मानले..
Discussion about this post