
याबाबत सविस्तर वृत्तांत असा की, पुणे येथील मंगळवार पेठ येथील ईएसके ऑटोमोबाईलचे मालक व कंत्राटदार इमरान इस्माईल शाह याने विश्वासघात करून फसवणुक केल्याबद्दल अझहर अली लियाकत अली यांनी पोलीस आयुक्त पुणे यांचेकडे तक्रार दाखल केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
अझहर अली यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की,ते शासकीय कंत्राटदार असुन इमरान शहा यांचेशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते.इमरानशहासुद्धा शासकीय कंत्राटदार असुन माझी सिंचन विभागातील मोठमोठ्या अधिकार्यांशी ओळख असुन त्यांच्यासोबत माझे घनिष्ठ संबंध आहेत.तु माझ्या नांवावर कंत्राट घे तुला खुप पैसा कमवुन देतो असे सांगितले.त्याच्यावर विश्वास ठेऊन अझहर अलीने काम करण्यास होकार दिला.इमरान शाह याने कंत्राट घेण्यासाठी अजहर यांचेकडे आठ लाख रुपयांची मागणी केली.व कंत्राट घेतल्यावर तुला तेहतिस टक्के नफा देईल असेही सांगितले.अझहर अलीने त्याचेवर विश्वास ठेऊन दिनांक २५नोव्हेंबर २०२०रोजी आरटीएसद्वारे इमरान यास आठ लाख रुपये दिले.
इमरानने देगाव बार्शी येथे धरणाचे काम घेतल्याचे सांगितले व या कामासाठी २०२१मधे पुन्हा दोन लाख रुपयांची मागणी अजहरकडे केली.अजहरकडे पैसे नव्हते त्यामुळे त्यांनी मित्रांकडून उसने घेऊन इमरान यास दोन लाख रुपये दिले.यानंतरही इमरानने अजहरकडे कामाच्या नावाखाली पैसे उकळले.अशाप्रकारे खोटे बोलुन व फसवणुक करून इमरान यांने अजहरकडुन साडे बारा लाख रुपये लुबाडले.कामाचे बील निघाल्यानंतर कामात घाटा झाला असे सांगून मी तुला साडेसात लाख रुपये व पाच लाखाचे कंत्राट देईल असे आश्वासन देऊन वेळ मारून नेली.वेळोवेळी मागणी करूनही इमरान याने चार वर्षांत केवळ तिन लाख रुपये परत केले व बाकी रक्कम देण्यास टाळाटाळ केल्याने आपला विश्वासघात व फसवणुक झाल्यामुळे अझहर अली यांनी इमरान शाह याचेविरुद्ध पोलिस आयुक्त यांचेकडे तक्रार दाखल केली आहे.लवकरच भारतीय न्याय संहिता कलम ३१८,३१९नुसार इमरान शाह याचेविरुद्ध गुन्हा दाखल होणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे.
Discussion about this post