लोकमत न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी लातूर
.उदगीर तालुक्यातील लोहारा परिसरात खरीप हंगामात पेरणी केलेल्या तूर पिकावर हिरव्या उंट अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.उधार पाधार औषधे आणून तूर पिक फवारणीसाठी लगबग करीत आहेत.
गतवर्षापेक्षा यावर्षी समाधान कारक पाऊस झाला नसल्याने सोयाबीन पिकाच्या उत्पादनात घट झाली आहे.हलक्या माळरान जमिणीवरील तूरीचे पिके जोमात आले असून ते चांगले बहरले आहे.
तुरीच्या पिकांना पाणी देत असल्याने तुरीच्या पिकाना फुले चट्टे शेंगा धरत असून हे तूर पीक भर फूले,चट्टा आवस्थेत आहेत. या तूर पिकावर हिरवी उंट अळीचा प्रादुर्भाव झाला असल्याने शेतकरी तुरीच्या पिकांना फवारण्यासाठी औषधी दुकानातून उधार पाधार औषधे आणून फवारणी करीत आहेत.
किड रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रार्दुभाव झाला असून या अळ्या चट्टा फुले शेंगा चखाऊन फस्त केले जात असल्याने तुरीचे पिक वाचवण्यासाठी शेतकरी औषधे दुकानावर औषधे खरेदी करण्यासाठी व फवारणीसाठी लागणा-या किटकनाशक औषध खरेदीसाठी पैशाची इकडून तिकडून जमवा जमव करुन बाजारातील महागड्या कंपण्याचे किटकनाशक औषधी खरेदी करुन तूर फवारणी करित आहेत.
अगोदरच यावर्षी पाऊस कमी झाला असून शेतकऱ्याच्या आशा परतीच्या पावसावर होत्या परंतु परतीचाही पाऊस गायब झाल्याने खरीपातील शेतकऱ्यांची आर्थिक भिस्त असलेल्या सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले असून शासनाकडे नुकसानीची पंचनामे करण्यात आले तरी अद्याप शासनाकडून कसलीही आर्थिक मदत मिळाली नसल्याने शेतकऱ्यांना बाजारातील सावकार,आडत व्यापारी यांच्याकडे जाऊन फवारणी औषधासाठी चक्करा मारुन फवारणी करित आहेत.
उच्च टमया परिसरात सकाळच्या प्रहरी मोठ्या प्रमाणात तूरीवर जाय धुई (जाळ) फिरली जात आहे.त्यामुळे तूर पिकाची फूल,डि-या,कोवळी चट्टा फळ याची मोठी गळ झाली यामुळे शेतकऱ्यांनी भितीपोटी तूर पिकावर बुरशीजन्य रोगाच्या प्रार्दुभावाची पहिली फवारणी तूर पिकावर केली तर काही दिवसातच या पिकावर कवळा चट्टा, शेगा फस्त करणारी उंट अळी,गुल्ला या किडरोगाचा प्रार्दुभाव झाल्याने पंधरा दिवसातच दुसरी फवारणी करण्याची शेतकऱ्यांवर वाईट वेळ आली असून आर्थिक आडचणीत सापडून मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांना शेती समस्यांना तोंड देत सामना करावा लागत आहे.
मत
शेतकरी
योगेश संतराम वाडकर
सोनारवाडी/डिगोळ
परतीच्या पावसावर शेतकरी अवलंबून होता परंतु परतीचा पाऊस गायब झाल्याने सोयाबीनचे पिकाचे मोठे नुकसान झाले असून उत्पादनात मोठी घट झाली आहे,सध्या पाणी फिरले ल्या जमिनीवर तुरीचे पिके जोमात आली आहे परंतु तूरीच्या पिकावर किडरोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने दुसऱ्यांंदा फवारणी करण्याची शेतकऱ्यांवर वाईट वेळ आली असून आर्थिक आडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांला तात्काळ मदतीचे वाटप करण्याची मागणी केली जात आहे.
फोटो ओळी : लोहारा परिसरात ढगाळ वातावरणामुळे तुरीचे पिके जोमात आली असून या तूरीच्या पिकावर हिरवी उंट अळी,पडली आहे किड रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रार्दुभाव झाल्याने शेतकरी तूरीचे पिक फवारणीत गुंतला आहे.
Discussion about this post