





“सन्मान एका कार्यकुशल, हरहुन्नरी, अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा..!”
पेण तालुक्यातील खारपाडा गावातील एक नेतृत्व, कर्तृत्व आणि वक्तृत्व, तरुणांचे प्रेरणास्थान, आधारस्तंभ, शिवशंभू चरित्र इतिहास अभ्यासक, राज्यस्तरीय व्यसनमुक्तीदुत, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते, युवा फ्रेंडस सर्कल फाउंडेशन(एनजीओ)चे संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र भूषण पत्रकार कैलासराजे निर्मला कमलाकर घरत यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि उत्कृष्ठ पत्रकारिता कार्याचा सन्मान जनसामान्यांचा आरसा, हिंदुत्वाचा वारसा! “साप्ताहिक भगवे वादळ” तृतीय वर्धापन दिनानिमित्त रविवार दिनांक १० नोव्हेंबर २०२४
रोजी नायगाव- दादर- मुंबई येथे भव्य दिव्य कार्यक्रमात
डॉ.जगन्नाथरावहेगडे(मा.नागरपाल), डॉ.सुकृत खांडेकर (संपादक-दैनिक प्रहार),डॉ. जिवबा केळुसकर(शिक्षण तज्ज्ञ संशोधक),जेष्ठ साहित्यिक श्री.राम मेस्त्री, श्री.मधुकर गजाकोश या मान्यवरांच्या शुभहस्ते जेष्ठ पत्रकार कैलासराजे घरत यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी धर्मपत्नी सौ.मयूरी कैलास घरत, शिवकन्या कु.ओवी कैलास घरत पुरस्कार समारंभास सोबत उपस्थित होती. या सोहळ्याचे आयोजन संपादक श्री.दत्ता खंदारे साहेब यांनी केले होते. यावेळी पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते श्री. विजय वसंत कांबळे साहेब यांचा देखील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
जेष्ठ साहित्यिक विलास देवळेकर, जेष्ठ पत्रकार साहित्यिक श्री. शशिकांत सावंत साहेब यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त केक कापून साजरा करण्यात आला. त्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार कैलासराजे निर्मला कमलाकर घरत यांना अनेक राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले असून त्यांची पुरस्कारांची मालिका अखंडपणे सुरूच आहे.
राष्ट्रीय पुरस्कार*:-
१) महात्मा ज्योतिबा फुले राष्ट्रीय फेलोशीप पुरस्कार-२०२३
२) राजमाता जिजाऊ राष्ट्रीय गौरव सन्मान-२०२३
३) छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्र गौरव पुरस्कार-२०२४
४) नॅशनल एक्सलेंट अवॉर्ड २०२४
५)श्री शिरोमणी संत रोहिदास महाराज राष्ट्रीय पुरस्कार २०२४
*राज्यस्तरीय पुरस्कार* :-
१) कोकणभूषण पुरस्कार-२०२३
२) समाजरत्न पुरस्कार-२०२३
३) छत्रपती शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार-२०२४
४) महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२४
*पत्रकारितेच्या माध्यमातून करत असलेले सामाजिक कार्य:-
१)एमएमआरडिए विरोधात जनहित याचिका दाखल करण्यासाठी जनजागृती करून घरोघरी जाऊन अर्ज भरून घेतले
२) खारपाडा सावरोली सर्व्हिस रोड दुरावस्था बद्दल ग्रामपंचायत तसेच प्रांत अधिकारी सार्वजनिक बांधकाम रस्ते विभाग यांना लेखी पत्र व्यवहार करून जनहितासाठी वृत्तपत्राद्वारे बातमी प्रसिद्ध करून वाचा फोडली.
३) कातळाचा नंबर शेतकरी संघर्ष संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात जनजागृती तसेच पत्रकार परिषद बोलावून हा मुद्दा उचलून धरला आहे.
४) शेतकरी संघटना खारपाडा दुष्मी ठाकूरपाडा येथील वडिलोपार्जित आजतागायत कसत असलेली जमीन लाटण्याचा काही ठराविक लोकांनी घाट घातला होता त्याविरोधात शेतकऱ्यांनी
कोर्टात याचिका दाखल केली, तसेच स्थानिक खासदार यांचेशी सदिच्छा भेट घेवून त्यांनी हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रांत आणि तहसीलदार साहेब यांचे सोबत शेतकऱ्यांची सभा आयोजित करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या अन्यायाची बातमी वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आली.
सन्मानिय कैलासराजे घरत एक उत्तम निर्भिड पत्रकार असून जनसामान्यांच्या समस्यांना, अन्यायाला आपल्या लेखणीच्या पत्रकारितेच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. अपघात ग्रस्तांना उपचारासाठी मदत, शासकीय रुग्णालयात दाखल करण्यासाठी सहकार्य करणे असे कोणतेही क्षेत्र बाकी नाही. जिथे कमी तिथे आम्ही. त्यांचे कार्य हीच त्यांची ओळख बनली आहे. प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. त्यांच्यासारख्या एका कार्यकुशल, हरहुन्नरी, अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा “आचार्य अत्रे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने गौरविण्यात आल्याबद्दल विविध राजकीय, विविध सामाजिक संघटना, डी वाय फाउंडेशन, भारतीय दलीत साहित्य अकादमी मुंबई, कोंकणदीप परिवार, जनचक्र न्यूज, सारथी न्यूज, जनादेश न्यूज, रायगड स्वाभिमान वृत्तपत्र, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई पत्रकार संघ, पत्रकार मित्र, पदाधिकारी यांच्याकडून अभिनंदनासह शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
रायगड स्वाभिमान, जन न्यूज चॅनेल, जनचक्र वार्ता साप्ताहिक , सारथी न्यूज, जय महाराष्ट्र न्यूज, साप्ताहिक वेध विकासाचा, महाराष्ट्र न्यूज, युथ महाराष्ट्र वृत्तपत्र प्रतिनिधी म्हणून गेली अनेक वर्षे काम करीत असताना समाजातील अनेक समस्यांना वाचा फोडण्याचे, शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात जनजागृती तसेच अनेक मोर्चा उपोषण, धरणे आंदोलन यात सक्रिय सहभाग, अनेक राज्यस्तरीय सामाजिक संस्थांमध्ये ते सक्रिय कार्यरत असून युवा फ्रेंडस सर्कल फाउंडेशन(एनजीओ) या सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष या नात्याने सामाजिक बांधिलकी जपत अनेक समाजपयोगी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्य, वृक्षसंवर्धन, गडसंवर्धन स्वच्छता मोहीम, रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर, दंत चिकित्सा शिबिर,नेत्र तपासणी शिबिर, नशामुक्ती, मधुमेह मुक्ती, शिवशंभू चरित्र इतिहास अभ्यासक म्हणून अनेक शाळा महाविद्यालयातील विद्यार्थीसाठी विद्यार्थ्यांचे शंभूराजे, शिवशंभूचरित्र व्याख्यानमाळा, गडकोट संवर्धन माहिती पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे गडकोटांचे विविध भाग यांची माहिती देणे, सुंदर सुवाच्च हस्ताक्षर पाठमाळा, सर्प जनजागृती व्याख्यानमाळा, अभ्यास कसा करावा, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, संभाषण कौशल्य कार्यशाळा, इंग्लिश स्पीकिंग,
एस.एस.सी विद्यार्थी मार्गदर्शन शिबिर आणि शैक्षणिक साहित्य वाटप, एस.एस.सी विद्यार्थी गुणगौरव समारंभ सोहळा, वडमाळ वाडी, खैरासवाडी येथील आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी शैक्षणिक साहित्य वाटप, आदिवासी वाडीवस्तीवरील नागरिकांना बालविवाह प्रतिबंधक माहिती देवून जनजागृती करणे, विविध महापुरुष यांची जयंती, पुण्यतिथी साजरी करून त्यांचे विचार जनसामान्य नागरिकांच्या पर्यंत पोहविण्यासाठी सदैव प्रयत्नशील असतात..
Discussion about this post