महाडकरांसाठी एक अभिमानास्पद गोष्ट
महाड : प्रकाश अंकुश दाभेकर
महाड येथील डॉ. संजय मपारा (वय 69) व गिरीश हडप (वय 39)यांनी आज (दि.५) सकाळी महाड ते बदामी व हम्पी हा ६०० किलोमीटरचा प्रवास सायकलने सहा दिवसांत यशस्वीरत्या पूर्ण केला. त्यांच्या या कामगिरीमुळे महाडच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. ६९ वर्षीय डॉ. संजय मपारा यांनी दाखवलेली इच्छाशक्ती महाडकरांना भूषणावह आहे. तर त्यांना साथ देणाऱ्या गिरीश हडप हे डिफ्लॉन येथे ते महाड एमआयडीसी या कंपनीमध्ये कर्मचारी आहेत या दोघांवर अभिनंदनाचा वर्षाव होऊ लागला आहे.
सुमारे सहा दिवसांपूर्वी 29 नोव्हेंबर रोजी या दोघांनी प्रवास सुरू केल्याची माहिती या दोघांच्या कुटुंबीयांकडून दिली होती. महाड ते महाबळेश्वर 59 किलोमीटर, महाबळेश्वर सातारा, रहमतपूर, विटा 130 किलोमीटर, विटा, तासगाव, मिरज, तेरडल 115 किलोमीटर, टेरर महालिंगपूर मुधोळ बदामी 115 किलोमीटर, बदामी पट्टणकल्लू इलकल 59 किलोमीटर, इलकल होस्पेट हम्पी 102 किलोमीटरचा प्रवास आज सकाळी त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केला.
आज हम्पी शहरामध्ये फिरून उद्या पुणे मार्गे रेल्वेने ते महाडला परत येणार असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आले. यापूर्वी मागील वर्षी 18 जानेवारीरोजी या दोघांनी अलिबाग तर २०२२ मध्ये गोवा येथे सायकल प्रवास केला होता. बालरोग
तज्ञ म्हणून महाड परिसरात सुप्रसिद्ध असलेल्या डॉ. संजय मपारा यांचे सायकल प्रेम सुपरिचित आहे. त्यांना गेल्या काही वर्षात त्यांच्यापेक्षा कितीतरी वर्षांनी तरुण असणाऱ्या गिरीश हडप या महाड औद्योगिक वसाहतीमध्ये काम करणाऱ्या तरुणाने साथ दिली.
मपारा यांनी सत्तराव्या वर्षी दाखविलेली इच्छाशक्ती व धैर्य आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहे. या दोन महाडकर नागरिकांनी नवा अध्याय लिहिला असल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ नागरिक तसेच विविध सामाजिक संस्थाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. तरुण पिढीने या दोघांकडून प्रेरणा घेऊन अशा पद्धतीच्या साहसी मोहिमांमध्ये सहभागी व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे

Discussion about this post