
मोहोळ / प्रतिनिधी सलीम पटेल..
तब्बल तीस हजारापेक्षा जास्त
मताधिक्क्याने विजयी झालेले मोहोळ
विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित
आमदार राजाभाऊ खरे यांनी
विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनानंतर
आमदारकीची शपथ घेताच सर्वप्रथम
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची
परिवारातील सदस्यांसमवेत भेट घेऊन
शुभेच्छारूपी आशीर्वाद घेतले.
यावेळी
त्यांच्या समवेत पत्नी तृप्तीताई खरे, सुकन्या
अवंती खरे या उपस्थित होत्या.
आ. खरे हे शिवसेनेकडून मोहोळ
विधानसभा मतदारसंघातून निवडणूक
लढवण्यासाठी इच्छुक होते. मात्र, हा
मतदारसंघ महायुतीच्या जागा वाटपातून
राष्ट्रवादी अजित पवार गटासाठी
सुटल्यामुळे त्यांना शिवसेनेतून उमेदवारी
मिळू शकली नाही. मात्र त्यानंतर त्यांनी
त्यांच्या आजवरच्या संपूर्ण राजकीय
ROM
वाटचालीचे मार्गदर्शक तथा तत्कालीन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन
काहीही झालं तरी निवडणूक लढवण्याची
इच्छा व्यक्त केली. एवढ्यावरच न थांबता
त्यांनी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी
शरदचंद्र पवार गटाकडून उमेदवारी
देखील मिळवली. पहिल्याच प्रयत्नात
खरे मोठ्या मताधिक्याने निवडून आले.
विजयानंतर त्यांनी ना. एकनाथ शिंदे
यांच्याच मार्गदर्शनानुसार आपण आजवर
राजकीय क्षेत्रात कार्यरत असून यापुढील
काळातही त्यांचे बहुमोल मार्गदर्शन सदैव
घेत राहणार असल्याचे यापूर्वीच जाहीर
केले होते.
अधिवेशनातील शपथविधीनंतर
त्यांनी प्रथम ना. शिंदे यांच्या निवासस्थानी
आवर्जून सहकुटुंब जाऊन त्यांच्याकडून
शुभेच्छा स्वीकारल्या.
ना. शिंदे यांच्या प्रेरणेतूनच
लोकाभिमुख काम
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांच्या संपूर्ण शिंदे परिवाराशी आणि
खरे परिवाराचा १९९१ पासूनचा कौटुंबिक स्नेह आजही कायम आहे.
या उत्कृष्ट स्नेहभावणीतूनच आमदार खरे यांनी शिंदे यांची भेट घेऊन एक आत्मिक ऋणानुबंध जपला आहे. खरे यांच्या हातून सर्वसामान्यांची सेवा घडावी यासाठी आमदार राजू खरे हे आमदार व्हावेत अशी इच्छा वेळोवेळी ना.शिंदे यांनी त्यांना प्रत्यक्ष बोलून दाखवली होती. त्यांच्या प्रेरणेतूनच खरे यांनी मोहोळ मतदार संघातील गेल्या काही वर्षांत लोकाभिमुख विकासकामे केली आहेत..
Discussion about this post