
पुणे येथील हडपसर येथे अनेक भाषेचे तज्ञ शिक्षक म्हणून कार्यरत होते. आपल्या सुंदर कौशल्याने अनेक विध्यार्थी त्यांनी निर्माण केले. आपल्या चांगल्या कर्तृत्वाने सरांनी अनेक पारितोषिके प्राप्त करून घेतली होती. विध्यार्थी आणि समजपयोगी अनेक उपक्रम यांनी आपल्या सेवा कार्यकाळात पार पाडले.त्यांची जनप्रीयता खुप दुरवर पसरलेली होती.आपले कार्य पाडत असताना त्यांनी नातीगोती सुद्धा खुप उत्तम रित्या सांभाळून घेतली होती. प्रत्येकाला निःस्वार्थ उदार अंतःकरणाने मदत करणे हे त्यांचे परम कर्तव्य ते मानत होते. प्रत्येकाच्या सुखदुःखात ते नेहमीच आपली हजेरी आवर्जून लावत होते. त्यांना माणसांच्या सानिध्यात राहणे अतिशय आवडत असे.सतत वाचन लिखाण काम करणे. क्रिकेट विषयी यांना जास्त आवड होती. त्यांचा शांत सय्यमी स्वभाव सर्वांना अतिशय आवडत असे.
त्यांचा शैक्षणिक आणि ज्ञानदाणाचा वसा तसाच अखंडितपणे चालू रहावा म्हणून त्यांच्या पत्नी श्रीमती कल्पना मनोहर म्हेत्रस व त्यांचे पुतणे मिलिंद जगन्नाथ म्हेत्रस यांनी श्री संत नामदेव महाराज संस्थेस समाजातील गरजू विदयार्थ्यांना इयत्ता 10 वी आणि 12 वी चे शिक्षण घेऊ शकतील या उद्देशाने सुमारे 50000/- (पन्नासहजर ) रुपये इतका धनादेश संस्थेचे अध्यक्ष यांचेकडे सुपूर्द करण्यात आला.या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन श्री संत नामदेव महाराज सेवा मंडळ याच्या वतीने संपूर्ण म्हेत्रस परिवाराचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले. हा एक उत्तम आदर्श प्रत्येक समाज बांधवांनी जरूर राभवावा
असे आवाहन करण्यात आले…
Discussion about this post