
:- पाटण रेल्वे गेट ते दिग्रस या गावापर्यंतचा दोन किलोमीटरचा रस्ता अतिशय खराब झालेला असून ,या मार्गाने ये करणाऱ्या दररोजच्या शेकडो वाहनधारकांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे . विशेष म्हणजे हा रस्ता बनविल्यानंतर अल्पावधीतच खड्डेमय झाला असून पूर्णतः दबलेला आहे . त्याच्यामुळे या रस्त्याने जाताना वाहनधारकांना प्रचंड त्रास होत आहे ,यासाठी या भागातील लोकांनी अनेकदा निवेदने तक्रारी दिलेल्या होत्या तरी मात्र हा रस्ता पूर्णतः दुरुस्त झालेला दिसत नाही .विशेष म्हणजे हा रस्ता अतिशय महत्त्वपूर्ण असून दिग्रस येथील पैनगंगा फुलाच्या नंतर तेलंगणा प्रांताला जोडणारा हा रस्ता आहे .त्यामुळे तेलंगानातून महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रातून तेलंगणात दररोज या मार्गाने ट्रक , दुचाकी आणि इतर तीन चाकी आणी इतर चार चाकी वाहने मोठ्या प्रमाणात ये जा करतात . या मार्गाने जड वाहतुकही वाढलेली दिसते . दिग्रस येथील नागरिकांनाही पाटण कडे किंवा बोरी कडे जाण्यासाठी याच मार्गाने जावे लागते . त्यामुळे या खड्डेमय रस्त्यावरून त्रास सहन करत जाण्याशिवाय पर्याय नाही . या रस्त्यामुळे वाहने खिळखिळी होत असून अनेकांना हाडांचे आजार झालेले दिसते .हा रस्ता त्वरित रहदारीसाठी योग्य बनविण्यात यावा अन्यथा या भागातील जनता आक्रमक भूमिका घेतल्याशिवाय राहणार नाही असा जनतेचा सूर दिसून येत आहे..
Discussion about this post