बाळासाहेब कुंभार यशवंतराव चव्हाण कला क्रिडा महोत्सव शिरूर तालुका पातळीवर सादलगाव येथे झालेल्या स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रांजणगाव शाळेने भजन स्पर्धा लहान गट द्वितीय क्रमांक व कविता गायन द्वितीय क्रमांक प्राप्त झाला त्याबद्दल विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचा सन्मान प्रमाण पत्र व सन्मान चिन्ह देऊन करण्यात आला.
हा सन्मान माननीय बाळकृष्ण कळमकर साहेब गटशिक्षण अधिकारी, किसन खोडदे साहेब , पवार साहेब, काळूराम चकोर साहेब , श्री कि .प . शिंदे (केंद्रप्रमुख), माऊली पुंडे , कोषाध्यक्ष सोमनाथ गायकवाड , आप्पासो रसाळ , संतोष शेवाळे ह्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी मुख्याध्यापक सुरेश थोरात , पंडित वेताळ , संजय कुमार वाळके सौ . विश्वमाला कारखिले , सौ सुरेखा गायकवाड, सौ मंगल शिंदे इत्यादी मार्गदर्शक शिक्षक उपस्थित होते . जि.प. शाळेला यश मिळाले बद्दल रांजणगाव गणपती सरपंच सुवर्णाताई वायदंडे , उपसरपंच श्रीकांत पाचुंदकर पाटील ,ग्रंथालय संघ शिरूर तालुका अध्यक्ष विवेकानंद फंड, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष राहूल वाघुले, उपाध्यक्ष रामदास बत्ते,
शाळा व्यवस्थापन समिती, संचालक मंडळ, ग्रामपंचायत सदस्य व आजी माजी पदाधिकारी तसेच बाळकृष्ण कळमकर, किसन खोडदे वि. अधिकारी , किसन पर्वती शिंदे के.प्र. रांजणगाव व सर्व शिक्षक वर्ग यांनी मुलांचे व शाळेचे अभिनंदन केले.
Discussion about this post