रांजणगाव गणपती ‘ प्रतिनिधी :बाळासाहेब कुंभार नेहमीप्रमाणे यंदाही हिवाळ्याची सुरुवात कडाक्याच्या थंडीने झाली आहे.राज्यभर थंडीचा जोर वाढत असताना समाजातील दुर्बल वंचित कुटुंबातील मुले या गारठ्याचा सामना करत आहेत. या पार्श्वभूमीवर मायेची ऊब फाउंडेशन या संस्थेने पुणे व नगर जिल्ह्यातील दोनशे मुलांना आपल्याच कुटुंबातील सदस्य या नात्याने उबदार कपडे व साहित्याचे वाटप केले आहे.
संस्थेने या गरजू मुलांवर एक प्रकारे मायेचे उबदार पांघरूनच घातले आहे. संस्थेने पुणे जिल्ह्यातील गणेशखिंड,भिसांबा ठाकरवाडी,कडूस कातकरी वस्ती,उगलेवाडी,फदालेवाडी,आशीर्वाद अनाथाश्रम, बालग्राम संस्था व नगर जिल्ह्यातील गजरमलवाडी, भिल्ल वस्ती वांगदरी येथील एकूण दोनशे मुलांपर्यंत ही उबदार भेट पोहोचवली.
या सामाजिक उपक्रमासाठी संस्थेचे सदस्य अण्णासाहेब शेळके,उमेश धुमाळ,विकास हजारे,कुणाल नवले,चंद्रकांत खैरे,अशोक कर्डिले,त्रिंबक भाकरे,विजय गोडसे,संतोष विधाते,रामचंद्र नवले,बिभिषन गांजे,गोरख काळे,जयश्री वाजगे,सविता थोरात,अनिता गोसावी,राजश्री मोटे,कांताराम शिंदे,खंडेराव होळकर,रोहिदास बांदल,रमेश पावडे,राजेंद्र वाखारे,राजेंद्र कर्डिले,नानासो गर्जे,पोपट गांधले,विद्या सोनार,प्रमिला साठे यांनी संपूर्ण जबाबदारी स्वीकारली.
सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवून मागील दहा वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे. या सामाजिक कार्याबाबत प्रबोधन केंद्राचे संस्थापक उत्तम अण्णा भोंडवे,शिरूर तालुका ग्रंथालय संघाचे अध्यक्ष विवेकानंद फंड, महाराष्ट्र साहित्य परिषद शिरूरचे अध्यक्ष मनोहर परदेशी,रोटरी क्लब ऑफ शिक्रापूरचे अध्यक्ष विठ्ठल वाघ व बालकुमार साहित्य संस्थेचे राज्य प्रतिनिधी सचिन बेंडभर यांनी संस्थेचे कौतुक केले आहे.
हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी फाउंडेशनचे मुख्य समन्वयक म्हणून अनिल पलांडे,शांताराम नेहरे व मच्छिंद्र झांजरे यांचे अनमोल सहकार्य लाभले.या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे अध्यक्ष राहुल चातुर,कार्याध्यक्ष कल्याण कोकाटे यांनी आभार मानले आहे. यापुढील काळात देखील हे कार्य अधिक विस्तृत स्वरूपात सुरू राहणार असल्याची माहिती उपाध्यक्षा मंगल लाळगे व सचिव ललिता भुजबळ यांनी दिली.
Discussion about this post