शिरूर तालुक्यात पुन्हा एकदा नरभक्षक बिबट्याचा धुमाकूळ
कोणी त्याला हत्यारा संबोवतात.तर कोणी खुनी.बिबट्या.रक्त पिणारा नरभक्षक असे अनेक प्रकारच्या नावाने त्याला लोक आता ओळखू लागले आहे.मागील काही महिन्यांपूर्वी वनविभागाने जाहीर केले की.मांडवगण फराटा. वडगाव रासाई पिंपळसुटी.इनामगाव.नागरगाव.अंधळगाव या सर्व भागात जवळ जवळ ४० ते ३५ बिबट्या अंदाजे आहे असे वर्तवले आहेत.तसेच भीमा नदीच्या किनारी असलेले भागातील गावे.बाराही महिने पाणी असल्याने प्रमुख पीक म्हणून ऊस लावला जात आहे.उसामुळे सर्व भाग हा हिरवळ एखादे जंगल असल्या सारखे दिसत आहे.आणि हा भाग बिबट्या साठी अगदी राहण्या योग्य असल्याने तो ऊसात राहत आहे.हा बिबट्या अनेकांवर त्याची भूक भागवण्यासाठी तो मनुष्य भागात येऊन हल्ला करीत आहे.तो सुरुवातीला लपून हल्ला करीत असे.पण आता तो अगदी मनुष्य वस्ती वर येऊन तो हल्ला करीत आहे. एवढेच नाही तर तो एका ठिकाणी राहत नाही तर जागाही बदलत आहे.दिवसा अपरात्री हा बिबट्या आता दिसू लागला आहे.कधी कधी तर तो मोटार सायकलच्या मागे धावत आहे तर कधी काहींना झाडांवर झोपताना दिसत आहे.कधी तर अचानक ऊसातून बाहेर येताना दिसतो.
अशीच एक हळहळ करणारी घटना शिरूर येथील पिंपळसुटी या गावात घडली आहे. माहितीनुसार सायंकाळी बिबट्याने पुन्हा एका ४ वर्षाच्या लहान लेकरावर हल्ला केला.हा हल्ला बिबट्याने संध्याकाळी ६:३० ते ६:४५ दरम्यान घडल्याचे वृत्त संपूर्ण गावात पसरली.घटनाक्रम असा की स्वयंपाक करून मुलीची आई दुसऱ्या घरात जात असता अगदी त्याचवेळी विद्युत पुरवठा बंद होतो. आई मागे वळून पाहता क्षणी दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्या लहान मुलीला मान पकडून नदीच्या कडेला असलेल्या ऊसात नेले.त्यावेळी पुरुष मंडळी काम निमित्त गावात होते.सर्व ठिकाणी अंधार पसरला होता.आई ओरडली.
रक्षा गेली.तेव्हा कोठे काही लोक जमा झाले. नरभक्षक हा अचानक येऊन मुलीचे नरडे पकडून तिला ऊसात घेऊन गेला.म्हणून आईने हंबरडा फोडला.आजूबाजूचे लोक येऊन इकडे तिकडे बघत होते.आणि काही अंतरावर दिड तासांनी मृतदेह त्या लेकराचा सापडला. मान धड वेगळे असे आढळून आले सर्व ठिकाणी रक्तच रक्त असे होते. (घटना घडलेल्या मुलीचे नाव रक्षा अजय निकम ) असे आहे.या घटनेची माहिती मिळताच बुधवारी ( दी – २५/१३/२०२४) सकाळी वन विभागाच्या वतीने घटनास्थळ परिसरात १० पिंजरे.व १० ट्रॅप लावण्यात आले.जुन्नर वन विभागाचे उपवसंरक्षक अमोल सातपुते.सहायक उपवनसंरक्षक अमृत शिंदे यांनी घटनास्थळी पाहणी केली.तसेच ग्रामस्थांनी बैठक घेत या घटनेबद्दल संताप व्यक्त केला.निवेदन वन विभागाला देण्यात आले.अशीच गेल्या दोन महिन्यात पूर्वी मांडवगण फराटा येथे एका लहान मुलाला बिबट्याने नेले होते ही बातमी सहैद्रीचा राखणदार मध्ये २१/१०/२०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते.आता बिबट्या अपडेट होऊ लागले आहेत.ऊसात. रानांत.शेतात.घराच्या अंगणात येऊन भ्याड हल्ला करू लागले आहेत. प्रशासन.वनविभाग. ग्रामस्थ.लोकप्रतिनिधी यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे ही विनंती करण्यात आली आहे…
काय करावे असे वनपरिमंडल अधिकारी. शिंदे भानुदास सखाराम यांना विचारले असता त्यांनी सांगितले की शेतात एकट्या बाईने काम करू नये.बाईने गळ्या भोवती स्कार्फ बांधावे.संगतीने काम करावे. बिबट्याची शिकार मनुष्य नाही.जंगलातील छोटे प्राणी.कुत्रे.बकरी.गाईचे वासरू.दोन अडीच फुटाचे प्राणी यावर हल्ला करतो.
ह्या भागात बिबट्या येण्याचे कारण काय असेल तर त्यांनी उत्तर देली की.बिबट्या प्रामुख्याने जुन्नर.भीमाशंकर या अभयारण्य भागातून हा प्राणी शिकारीच्या शोधात तो आला.आपल्या भागात चार पाच धरण असल्याने पाणी राहण्यासाठी ऊस छोटे मोठे शिकारी मिळू लागल्याने पहिल्यांदा तो शिक्रापूर येथील जातेगाव या भागात २००८ मध्ये दिसून आला.त्यानंतर तो २००९ मध्ये नागरगाव या गावात आढळून आला व आता तो आपणास या भागातही दिसत आहे.असे शिंदे वनपरिमंडल अधिकारी यांनी सांगितले.
ही घटना का घडली
अजय निकम हे नदी किनारी राहतात.त्याच्या आसपास दोन तीन घरे आहेत.चारही बाजूला बाभळीचे वन आहे.त्यांना विजेचे स्रोत नाही.आकडा टाकून वीज मिळवतात.स्वतः ताचे घर नाही. वीट गवत पासून घर त्यांनी छोटे केलेल्या घरात राहतात. प्लास्टिकच्या पालात स्वयंपाक बनवतात.भिल समाजाचे आहेत.घरकुल सुविधा त्यांना नाही.गेल्या दहा ते १५ वर्षा पासून ते तिथे राहतात….
Discussion about this post