सोनगीर येथील एन.जी.बागुल हायस्कूल व संलग्न जुनिअर कॉलेज सोनगीर येथे पालक-शिक्षक सहविचार सभा झाली. या पालक-शिक्षक सभेच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य एच.एस.विसपुते सर हे होते. तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी असलेले प्राचार्य एच एस विसपुते सर यांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
या कार्यक्रमातचे प्रमुख पाहुणे म्हणून सोनगीर विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष सुनीलजी बागुल, शाळेचे सचिव चंद्रशेखरजी बागुल,सामाजिक कार्यकर्ते अमितभाऊ बागुल, पर्यवेक्षक व्ही.एस.सोनार सर हे उपस्थित होते. या पालक शिक्षक सभेच्या कार्यक्रमाच्या वेळी बहुसंख्य पालक व महिला पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वेळी शाळेचे शिक्षक उपप्राचार्य कैलास दुसाने सर यांनी आपल्या प्रास्ताविकेतून पालक शिक्षक मिळावा घेण्याचा उद्देश सांगितला तसेच शाळेचे शिक्षक श्री मधुकर रोकडे सर यांनी दहावी व बारावीच्या परीक्षेत बसलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी परीक्षेत संदर्भातील चांगल्या प्रकारची तयारी करावी व पालकांनी आपल्या पाल्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे असे सांगितले.
या कार्यक्रमाचे शेवटी या पालक शिक्षक सभेचे अध्यक्षस्थानी असलेले शाळेचे प्राचार्य एच.एस.विसपुते सर यांनी विद्यार्थी विद्यार्थिनींच्या सुरक्षेविषयी काळजी पालकांनी व शिक्षकांनी घेणे तसेच वर्षभरात शाळेत शासनाच्या विविध योजना आणि शिष्यवृत्ती व शाळेत वर्षभरात कोणकोणते उपक्रम राबवले जातात यांची माहिती पालकांना दिली
.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे उपप्राचार्य कैलास दुसाने यांनी केले तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक यशवंत धनगर यांनी केले तर आभार शिक्षक नितीन दुसाने यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर बंधू-भगिनी यांचे सहकार्य लाभले….
Discussion about this post